Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गव्हाण फाटा-दिघोडे रस्त्यावर गतिरोधक बसवावे

माजी सरपंच विलास पाटील यांची मागणी चिरनेर : रामप्रहर वृत्त गव्हाण फाटा-दिघोडे या रहदारीच्या रस्त्यावर अवजड कंटेनर ट्रेलर्सची वाहतूक बेदरकारपणे होत असल्याने मोठ्या अपघातांची शक्यता बळावली आहे. पर्यायाने या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वीप्रमाणेच गतिरोधक बनवावे, अशी मागणी भाजपचे युवा नेते व वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास पाटील यांनी केली …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने योग्य कारवाई करावी

सहकार आयुक्तांची आरबीआयला शिफारस पनवेल : रामप्रहर वृत्त कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी अंतरिम अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाई करावी, अशी शिफारस सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी …

Read More »

सारडे विकास मंचच्या किल्ले स्पर्धांचे पारितोषिक वितरण

सारडे : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सारडे विकास मंचच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर किल्ले स्पर्धा घेण्यात आली. अतिशय सुंदर अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असे गडकिल्ले या चिमुरड्यांनी स्वतःच्या मेहनतीने बनविले आहेत. त्याचे श्रेय या मुलांनाच जाते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला अनुज केसरीनाथ पाटील, द्वितीय आयुष महेंद्र पाटील, तर उत्तेजनार्थ दीपेश …

Read More »

‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न मिळावे’

पनवेल : क्रांतिकारी सेवा संघ यांच्यातर्फे 4 नोव्हेंबर रोजी वाकडी येथे पनवेलचे सुपुत्र व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अभिनेते महेश कोठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (दि. …

Read More »

भारती नाईक आदर्श मुख्याध्यापिका

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने रिटघरमधील श्री भैरवदेव माध्यमिक विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती श्रीधर नाईक यांना ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार सोलापूर येथे झालेल्या 2019च्या अधिवेशनात शुक्रवारी (दि. 1) …

Read More »

डांबरात अडकलेल्या नागाला जीवदान

उरण : प्रतिनिधी चिरनेर-विंधणे रस्त्यावरील वेअरहाऊसमध्ये डांबरात अडकून शेवटची घटका मोजत असलेल्या सापाला सर्पमित्रांनी वाचविले. जीवाचा धोका पत्करून जवळ जवळ दोन तास तीन फुटी नागाला चिकटलेली डांबर त्यांनी काढली. नंतर तीन दिवसांनी त्याची जंगलात मुक्तात्त केली. एक नाग खारपाटील वेअरहाऊसमध्ये डांबराच्या पिम्पामध्ये आडकून पडला होता. संपूर्ण डांबर त्याच्या अंगाला लागल्याने …

Read More »

रेल्वेस्थानकात जिन्याच्या रुंदीकरणाची गरज

पनवेल : बातमीदार रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने अनेक गैरसोयी आहेत. पनवेल रेल्वेस्थानकात प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरील जिना रुंदीकरण करण्याची गरज आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. पनवेल रेल्वे स्थानकाची मंगळवारी (दि. 5) ठाकूर यांनी पाहणी केली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सोयीसुविधा जाणून घेण्यासाठी …

Read More »

दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे होणार संवर्धन प्रकल्प स्वराज्य अंतर्गत गडकिल्ल्यांचे रूपडे पालटणार

पनवेल : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडातील किल्ले संरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प स्वराज्य अंतर्गत राबविण्यात येणार्‍या या उपक्रमाची जबाबदारी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यावर देण्यात आली. यासाठी पनवेलच्या शिवसह्याद्री संस्थेने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 64 गडकिल्ले आहेत. यापैकी काही किल्ले राज्य …

Read More »

कळंबोळीजवळ महामार्गावर ट्रॅव्हल्सचा गराडा

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कळंबोली येथे असलेल्या मॅकडोनल्डच्या समोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचा गराडा पडलेला असून यामुळे येथून वाहन चालविताना मोठे जिकिरीचे बनले असून यातूनच एखाद्या दिवशी मोठा अपघात घडून नाहक प्रवासी या गाड्यांखाली चिरडले जाण्याची शक्यता असताना सुद्धा वाहतूक शाखा याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याबाबत प्रवासी वर्गाकडून …

Read More »

निकालाच्या पार्श्वभूमीवर संयम व शांतता पाळावी ः वपोनि लांडगे

पनवेल : वार्ताहर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनी संयम व शांतता पाळावी, असे आवाहन आज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केले. अयोध्या प्रश्नावरील निकाल लवकरच लागणार असून, संपूर्ण देशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »