Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात भाजप महायुतीचा खासदार निवडून येईल -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

अलिबाग ः प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जनतेकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 खासदार भाजप महायुतीचे निवडून येतील. रायगड लोकसभा मतदारसंघातूनदेखील भाजप महायुतीचाच खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे महाविजय 2024 अंतर्गत अलिबाग येथे …

Read More »

रो-रो बोटीतून प्रवासी समुद्रात पडला; मांडव्याजवळील घटना

अलिबाग : रामप्रहर वृत्त मुंबई-मांडवा रो-रो बोटीने प्रवास करीत असताना एक प्रवासी मांडवा जवळील समुद्रामध्ये पडला. नैमुद्दीन चौधरी असे या प्रवाशाचे नाव आहे. नैमुद्दीन अद्याप सापडला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सोमवारी (दि. 9) सकाळी 8 वाजता रो-रो बोट मुंबईहून मंडव्याला (अलिबाग) यायला निघाली. बोट मांडाव्याजवळ आली असता या …

Read More »

सर्वांना अभिप्रेत खासदार रायगडात निवडून आणू

भाजपच्या रोह्यातील बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार धाटाव : प्रतिनिधी दक्षिण रायगड भाजपचे संघटनात्मक बैठकांचा धडाका संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 7) रोह्याजील शासकीय विश्रामगृहत जिल्हा कमिटी …

Read More »

दि. रुबी मिल्सच्या कामगारांनी स्वीकारले जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण खालापूर : रामप्रहर वृत्त खालापूर तालुक्यातील खरसुंडी गावच्या हद्दीत असलेल्या दि रुबी मिल्समधील कामगारांनी भाजपप्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. तेथे युनिटच्या नामफलकाचे अनावरण भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 6) करण्यात आले. या कार्यक्रमास …

Read More »

महाडच्या प्रसोल कारखान्यात पुन्हा वायूगळती; एक ठार, चार कामगार जखमी

महाड : प्रतिनिधी महाड एमआयडीसीमधील प्रसोल या रासायनिक कारखान्यात गुरुवारी (दि. 5) सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास वायुगळती होऊन एका कामगाराचा मृत्यू आणि चार कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर महाडमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात …

Read More »

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान : अलिबागमध्ये 2162 श्री सदस्यांचा सहभाग

अलिबाग ः प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवाडानिमित्ताने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 1) अलिबाग तालुक्यातील विविध गावांत 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. श्री सदस्यांनी गावात जाणारे रस्ते, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, बाजारपेठ, समुद्रकिनारा रस्ते चकाचक केले. या अभियानात 2162 श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब …

Read More »

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सणासुदीच्या दिवसात ताजे, स्वच्छ तसेच भेसळ नसलेले पदार्थ विक्रीस ठेवण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत, मात्र तरीदेखील काही विक्रेते नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे अन्नपदार्थ तपासण्या मोहीम सुरू …

Read More »

रोह्यातील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

आतापर्यंत एकूण नऊ आरोपी गजाआड रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील धामणसई येथील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी मागोवा घेत बुलढाणा येथून अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली. धामणसई येथील एका खासगी शाळेत 12 ऑगस्ट रोजी जादूटोणा करण्यासाठी प्रयत्न सुरू …

Read More »

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शतकोत्तर दशकपूर्ती पूर्ण करून 111व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेच्या माध्यमातून महाडमधील सावरकर अनुयायांनी या गणेशोत्सवाची 110 वर्षांपूर्वी स्थापना केली. शतकपूर्ती करणारे …

Read More »

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे मंगळवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात आगमन झाले. सकाळपासून घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू होती. दीड दिवसांचा पाहुणा असलेल्या गणपती बाप्पांना बुधवारी (दि. 20) सायंकाळी निरोप देण्यात आला. जिल्ह्यात …

Read More »