Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडच्या मुलींचा क्रिकेट संघ विजयी

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत नाशिक येथे नुकतेच मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. रायगड संघाने तीनपैकी दोन सामने जिंकत दमदार कामगिरी केली . पहिला सामना रायगड विरुद्ध नाशिक असा होता, ज्यात नाशिक संघ प्रथम फलंदाजी करताना 28 षटकांत 172 धावांमध्ये गारद झाला. प्रत्युत्तरात रायगडकडून रोशनी …

Read More »

रायगड पुन्हा दुमदुमणार!

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी तिथीप्रमाणे साजरा करण्यात आलेल्या मंगळवारी (दि. 6) तारखेनुसार हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केली आहे. शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणावर …

Read More »

पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

कर्जत : प्रतिनिधी वटपौर्णिमा शनिवार (दि. 3) उत्साहात साजरी झाली. सुटी असल्याने चाकरमानी महिला दुपारच्या सुमारास वटवृक्षाची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या. कडक उन्हाळा असल्याने सुहासिनी अगदी संध्याकाळपर्यंत मनोभावे वटवृक्षाची पूजा करीत होत्या. यंदा विवाह सोहळे नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडले. अगदी काल-परवापर्यंत विवाह होत होते. त्यामुळे वटपौर्णिमेसाठी नववधूंची संख्या मोठी होती. …

Read More »

दहावीतही कोकण सरस; राज्यात एकूण निकाल 93.83 टक्के

पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि. 2) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला असून बारावीप्रमाणे दहावीतही कोकणाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत नऊ विभागीय मंडळांमध्ये अव्वलस्थान (98.11 टक्के) पटकाविले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी …

Read More »

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. 2) दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला. या सोहळ्यास …

Read More »

शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर

पेण ः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणारे हे सरकार आहे. जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन नऊ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण झाला. त्याचे सेलिब्रेशन नाही, तर कम्युनिकेशन …

Read More »

रायगडावर शुक्रवारी 350वा शिवराज्याभिषेक सोहळा

मान्यवरांची उपस्थिती; पंतप्रधानांच्या संदेशाचे होणार प्रक्षेपण महाड ः रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून शुक्रवारीशुक्रवारी शुक्रवारी (दि. 2) सकाळी 8.30 वाजता या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण …

Read More »

अमृत सरोवर अभियानांतर्गत रायगडातील 153 तलावांचे संवर्धन

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या अमृत सरोवर अभियान अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 153 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जीवन अशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर 25 तलावांचे संवर्धन करण्याची कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. सरोवर …

Read More »

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी रायगड जिल्हा दौर्‍यावर

अलिबाग ः प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी (दि. 30) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी सायंकाळी 4.15 ते 5 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज-3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द …

Read More »

अलिबाग एसटी स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी

परतीच्या प्रवासात पर्यटक बेहाल अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग एसटी स्थानकात पर्यटक आणि चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. मे महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. दुसरीकडे उन्हाळी सुटीसाठी आलेले चाकरमानीदेखील परतीच्या मार्गावर आहेत. मांडवा ते मुंबई ही प्रवासी जलवाहतूक सेवा दोन दिवसांपूर्वीच बंद झाली. परिणामी मुंबईला जाण्यासाठी एसटी …

Read More »