Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप

महाड ः प्रतिनिधीपुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारी (दि. 24) अन्न-पाण्याचे वाटप सुरू केले. महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. …

Read More »

रायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर येथील 15 घरांतील 78 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात …

Read More »

प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचे निधन

पेण ः प्रतिनिधी प्रख्यात कवी, संपादक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्गमध्येच झाले. पुढे मुंबईत महाविद्यालयीन …

Read More »

रायगडात दरडी कोसळून मृत्यूचे थैमान; महाडच्या तळीयेत माळीणची पुनरावृत्ती

38 जणांवर काळाचा घाला; मृतांची संख्या वाढण्याची भीती महाड ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्‍याखाली अनेक जण दबले गेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तेथे युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तळीये येथे गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास दरड …

Read More »

मधुकर ठाकूर सर्वांना मदत करणारे नेते होते

सर्व पक्षांची शोकसभेत श्रद्धांजली अलिबाग ः प्रतिनिधी माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर म्हणजे दिलेला शब्द पाळणारा आणि आपली तत्वे जपणारा माणूस होता. त्याचप्रमाणे गरिबीची जाण असणारा, राजकीय मतभेद विसरून सर्वांना मदत करणारा नेता होता, अशा भावना अलिबाग येथे आयोेेजित करण्यात आलेल्या शाकसभेत सर्वपक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. स्व. मधुकर ठाकूर यांना …

Read More »

नदीचे पाणी शिरले पोल्ट्रीत

झोराबियन चिक्स कंपनीचे अतोनात नुकसान खोपोली : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे पूर येवून खालापूर तालुक्यात अनेकांच्या घरात, व्यवसाय ठिकाणी पाणी शिरून नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 22) पहाटे डोलवली (ता. खालापूर) येथील झोराबियन चिक्स कंपनीत नदीचे पाणी घुसून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. झोराबियन चिक्स कंपनीत चिक्सची निर्मिती ते चिकन …

Read More »

पाली व जांभूळपाडा पूल दुसर्या दिवशीही पाण्याखाली

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यात बुधवारी व गुरुवारी (दि. 22) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण – पाली – खोपोली मार्गावरील पाली व जांभूळपाडा  पुल सलग दुसर्‍या दिवशीही पाण्याखाली गेले होते. अतिवृष्टीमुळे तालुक्यात काही ठिकाणी गुरांचे गोठे ढासळले, तर काही ठिकाणी रस्ते खचले, …

Read More »

खोपोली परिसरात पावसाचा धुमाकूळ

रुळांची भराव वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सोमवारपासून धुवाधार पडणार्‍या पावसाने गुरुवारी (दि. 22) अधिक रौद्ररूप धारण केल्याने खोपोली शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने खोपोली परिसरात फटकेबाजी सुरु केली. …

Read More »

माणगावातील अनेक गावांना पाण्याचा वेढा

काळनदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी माणगाव : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे.  काळनदीने माणगावमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात गुरुवार (दि. 22) सकाळपर्यंत 168 मिमी पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याने 24 जुलैपर्यंत जोरदार …

Read More »

महाडमध्ये पुराचा रुद्रावतार

सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांना रौद्ररूप महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे शहरातील बैठ्या घरांचे आणि लगतच्या शेतीचे, वाहनाचे आणि व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. …

Read More »