Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अलिबागमध्ये ब्युटी पार्लरला आग

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे येथील कृष्ण महल इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये मंगळवारी (दि. 20) संध्याकाळी अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीचा भडका उडाला आणि या आगीत पार्लरमधील फर्निचर जळून खाक झाले. इतर वस्तूंनाही आगीची झळ पोहचली. सुरुवातीला तिथे हजर असलेल्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, …

Read More »

पेणच्या गणेशमूर्तिकारांना फटका

कार्यशाळांमध्ये पाणी शिरून लाखोंचे नुकसान पेण : प्रतिनिधीगेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पडणार्‍या मुसळधार पावसामुळे सोमवारी पेण तालुक्यात पूर येऊन नदी व खाडी किनारी असणार्‍या गावांत पाणी घुसले. या पुराचा फटका पेण शहर व परिसरातील नदीकाठच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना मोठ्या प्रमाणात बसून, तयार मूर्तींचे नुकसान झाले आहे.पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, दादर, …

Read More »

कर्जतमध्ये घरफोड्या करणार्या पाच आरोपींना बेड्या

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार घरफोड्या करणार्‍या अट्टल पाच आरोपींना कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी आठ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 55 हजार 900 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील आय. पी. मार्केटिंग कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील उचकटून अज्ञात चोरट्यांनी संगणक संच व …

Read More »

कर्जत भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदी अॅड. प्रिती तिवारी

कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. प्रिती तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा गोगटे यांनी अ‍ॅड. प्रिती तिवारी यांची कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आमदार प्रशांत …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून रोठ ब्रु. ग्रामपंचायतीला औषधे वाटप

धाटाव : प्रतिनिधी कोरोना तिसर्‍या लाटेची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने करोना प्रतिकारशक्तीवर्धक औषध वाटप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार रविशेठ पाटील यांच्यातर्फे रोठ बुद्रुकचे सरपंच नितीन वारंगे यांच्याकडे प्रतिबंध औषधे सुपुर्द करण्यात आली. रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीला आमदार रवीशेठ पाटील त्यांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अलिबागच्या ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन

पनवेल ः रामप्रहर वृत्तअलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे नुकतेच निधन झाल्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन केले.माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा 15 जुलैला 74वा वाढदिवस होता, मात्र जन्मदिनीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रेमळ आणि सच्च्या स्वभावामुळे ते असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनात घर करून राहिलेले एक …

Read More »

ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक घोटाळे; ग्रामविकास अधिकार्‍याकडून आदिवासी सरपंचाच्या अज्ञानाचा गैरफायदा

कर्जत : बातमीदार नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील ममदापूर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकार्‍यामार्फत प्रचंड लूट झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागूनही ग्रामपंचायत देत नसल्याने किती आर्थिक घोटाळा आहे? याबाबत ग्रामस्थांत कुतूहल निर्माण झाले आहे. ममदापूर येथील सचिन अभंगे यांनी ग्रामपंचायतमधील ग्रामनिधी आणि 15 टक्के अनुदानातून करण्यात आलेल्या साहित्य …

Read More »

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य पोलादपूर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला ही रायगड जिल्ह्याची शान आहे. या रायगड जिल्ह्यात अनेक शूर मावळे, सरदार होऊन गेले. प्राणाची पर्वा न करता त्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी आपले प्राण पणास लावले. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचे कुडपणचे शेलारमामा यांनी क्रूरकर्मा …

Read More »

रायगडात कोसळधार

जिकडे तिकडे पाणीच पाणीजनजीवन विस्कळीत; तीन जण बेपत्ता अलिबाग ः प्रतिनिधीसलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 19) पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पाणी शिरून परिसर जलमय झाल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी दरडी कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात तीन जण बेपत्ता असून त्यांचा …

Read More »

नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली

कर्जत : बातमीदार गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी भागात सोमवारी (दि. 19) एक दरड कोसळली. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता वाहतुकीस बंद झाला होता, मात्र स्थानिक आणि टॅक्सी चालकांनी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात या घाटरस्त्यावर दरड कोसळण्याची ही दुसरी घटना …

Read More »