Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नेरळ आदिवासी वाड्यांत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कर्जत : बातमीदार नवी मुंबईतील श्री साई ट्रस्टकडून नेरळ भागातील चार आदिवासीवाड्यांमधील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या 109 आदिवासी विद्यार्थ्यांना श्री साई ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या डॉ. निर्मला राव, जयश्री जेठवानी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य आणि खाऊ यांचे वाटप देण्यात आले. त्यानंतर …

Read More »

खोपोलीतील कृत्रिम तलावात 268 गणपतीचे विसर्जन

खोपोली : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांत शहरातील 268 गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी खोपोली शहरातील नेहरू गार्डन, लक्ष्मी नगर गार्डन व शिळफाटा येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. शिवाय तीन टेम्पो …

Read More »

तेल तवंगाने रेवदंडा समुद्रकिनारा विद्रुप

कांदळवनास धोका; तांडेल फांउडेशनची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार रेवदंडा : प्रतिनिधी तेलतवंग पसरल्याने रेवदंडा समुद्रकिनारा विद्रुप होत असून, पर्यटकही नाराज झाले आहेत. समुद्रातून वाहून आलेला तेलतवंग किनार्‍यावरील कांदळवनास हानिकारक असून, कांदळवन नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याबाबत पै. अब्बासभाई तांडेल फाउंडेशनच्या अध्यक्षा नईमा सलीम तांडेल यांनी महाराष्ट्र प्रदुषण …

Read More »

महाराष्ट्रात ई-पीक नोंदणी सोयीची

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. पूर्वी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. एकाच तलाठयाकडे चार ते पाच गावे असल्याने तो तलाठी कधी येईल आणि आपला सातबारा कधी मिळेल …

Read More »

रायगडात पावसाची संततधार

पनवेल, रोहे : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.गणपती विसर्जनानंतर तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून आला. पावसामुळे बाजारपेठेत ग्राहक दिसत नव्हते.दरम्यान, जिल्ह्यात या वर्षी चांगला …

Read More »

माथेरान भाजपची नूतन कार्यकारिणी जाहीर

प्रवीण सकपाळ अध्यक्षपदी कर्जत ः बातमीदारमाथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. माथेरानमधील क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांची भाजप शहर अध्यक्ष, तर किरण चौधरी, सुभाष भोसले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.माथेरान शहरातील हॉटेल गार्डन व्ह्यू येथे झालेल्या …

Read More »

शिवसेनेचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे : महेंद्र घरत

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांंमध्ये काँग्रेसच्या मतांचा फायदा घेऊन काही लोक सत्तेत गेले. नंतर मात्र काँग्रसला विसरले. त्याचे शल्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. आता तसे होऊ देणार नाही. ज्यांनी आम्हाला फसवलं आहे त्यांच्याशी जशास तसे वागणार. आघाडी करण्यासाठी समविचारी पक्षांबरोबरच आता शिवसेनेचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे, असा इशारा काँग्रेसचे रायगड जिल्हा …

Read More »

महाविकास आघाडी ही सरकारसाठीची तडजोड

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे वक्तव्य श्रीवर्धन : प्रतिनिधीमहाविकास आघाडी ही आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी केलेली तडजोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर शिवसेना काँग्रेसी विचाराची कशी होऊ शकते? त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय …

Read More »

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारेे सरकार; भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल

अलिबाग : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौर्‍यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमय्या यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचविण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार आहे. अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, अशी टीका भाजपचे …

Read More »

बाप्पाला रायगडात भावपूर्ण निरोप…

म्हसळ्यात गणेश विसर्जन म्हसळा : प्रतिनिधी नऊ दिवस मुक्काम केल्यानंतर रविवारी म्हसळा शहरातील व तालुक्यातील सुमारे 640 गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरांत व फटाक्यांच्या आतषबाजीत निरोप देण्यात आला. म्हसळा शहरात वंजारा समाजाचा एकच गणपती सार्वजनिक होता व बहुतांश गणपती खाजगी असल्याने …

Read More »