Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

चक्रीवादळात माथेरानमधील वृद्धाचे घर उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार तौक्ते चक्रीवादळाने माथेरानला 24 तास वेठीस धरले होते. या वादळात भलेमोठे झाड कोसळून येथील मोहम्मद शेख यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. लॉकडाऊनमध्ये कोणताही व्यवसाय नसल्याने शासनाने बेघर झालेल्या शेख कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. माथेरानमध्ये नूर विला हा अबीद नुकमंदी यांच्या मालकीचा बंगला असून, तेथे मोहम्मद शेख …

Read More »

कोविडबाधितांसाठी फिरते वाचनालय

सहजसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम खालापूर ः प्रतिनिधी कोरोनामुळे मिळालेल्या निवांत वेळेचा उत्तम उपयोग व्हावा या विचारातून सातत्यपूर्ण सामाजिक चळवळ राबविणार्‍या सहजसेवा फाऊंडेशनमार्फत कोरोना रुग्ण ताणतणावापासून मुक्त रहावेत व त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी फिरते वाचनालय उपक्रम राबविण्यात आला. या वाचनालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 23) खोपोलीतून करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व …

Read More »

शेतकर्यांच्या उभारणीसाठी खरिपाची तयारी

शेतकर्‍यांनी स्वतःकडे असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेऊन बियाणे निवडावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी केले आहे. त्याच वेळी शासनाच्या बीज प्रक्रिया कार्यक्रमात भाग घेऊन अन्य शेतकर्‍यांसाठी चांगले बीजोत्पादन उपलब्ध करून देण्याचा सल्ला कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी प्रसिद्धपत्रक काढून शेतकर्‍यांना दिला आहे. सन …

Read More »

रायगडच्या किनार्‍यांवर पाच मृतदेह आढळले

पी 305 तराफ्यावरील बेपत्ता कर्मचारी असण्याची शक्यता अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यामधील नागाव, आवास, दिघोडी आणि मुरूड या समुद्रकिनार्‍यांवर शनिवारी (दि. 22) सकाळी पाच मृतदेह आढळले. हे मृतदेह अरबी समुद्रात बुडालेल्या पी 305 या तराफ्यावरील बेपत्ता कर्मचार्‍यांचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.अलिबाग तालुक्यातील नागाव येथे दोन, आवास व दिघोडी …

Read More »

नुकसानभरपाई लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार रविशेठ पाटील

पाली : रामप्रहर वृत्त तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 21) या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पाच्छापूर व नाडसुर आदी …

Read More »

सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी

नाभिक समाजाचे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी करोनाची दुसरी लाट सुरू आहे. सर्व व्यापार ठप्प आहेत. त्यात सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून उघडण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. …

Read More »

जनहितासाठी मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धरणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी सन 1966मध्ये सीमाप्रश्नासाठी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय …

Read More »

खोपोली भाजी मंडई रात्री आठपर्यंत राहणार खुली

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील महात्मा फुले मंडई रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिक व व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाचे स्वागत केले. लॉकडाऊनमध्ये फळे, भाजीपाला दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडी ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे या वेळेत मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे व त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव …

Read More »

नेरळमध्ये तीन विकासकामांचे भूमिपूजन

भाजपच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजनमधून नेरळ गावातील तीन विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. नेरळ ही लोकसंख्या …

Read More »

सुधागड पेडली येथे फसला ट्रेलर

पाली-खोपोली राज्यमहामार्गावर वाहतुकीचा खोळंबा पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या राज्य महामार्गावरील पेडली (ता. सुधागड) गावाजवळ  गुरुवारी (दि. 20) सायंकाळी मोठा ट्रेलर मोरीमध्ये फसला होता. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. हा ट्रेलर रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत …

Read More »