Breaking News

Ankit Shah

मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक

मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायलयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुरुड शहरात राहणार्‍या संजिदा मुश्ताक मुकाबी संतोष बेकरी येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची पर्स त्या बेकरीत विसरून घरी निघून गेल्या. त्यांना याबाबत आठवण झाल्यावर त्या …

Read More »

कर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर

कर्जत : बातमीदार – कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्गावर दोन लहान पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली होती. शासनाने सार्वजनिक हिताची कामे करण्यास तिसर्‍या लॉक डाऊनमध्ये परवानगी दिल्यानंतर तुटपुंज्या मजुरांना सोबत घेऊन कर्जत तालुक्यातील या दोन्ही पुलांची कामे पूर्णत्वाकडे नेली हात आहेत. कर्जत-नेरळ-शेलू कर्जत हद्द या कर्जत-कल्याण राज्यमार्गाचा भाग असलेल्या रस्त्यावर हायब्रीड …

Read More »

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

चोळे टेपमध्ये आणखी पाचजण पॉझिटिव्ह पाली : प्रतिनिधी – शिहू ग्रामपंचायत हद्दीतील चोळेटेप येथील एका वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. चोळे टेप येथील महिला मुंबईतील विक्रोळी येथून 16 मे रोजी कुटुंबीयांसह आपल्या गावी आली होती. तिला शुगरचा त्रास होता. …

Read More »

भीती टोळधाडीची!

लोक एका विचित्र मन:स्थितीत आहेत. दोन महिने घरात कोंडून घेऊन राहणे ही सोपी गोष्ट अजिबातच नाही. त्यामुळेच आता खरोखरीच लोकांचा धीर हलकेहलके ओसरू लागला आहे. असेच किती काळ बसायचे ही भावना बळावते आहेच. पण त्याचवेळेला राज्यातील व विशेषत: मुंबईतील करोनासंदर्भातील वाढती आकडेवारी लोकांना धास्तावतेही आहे. कोरोनाच्या फैलावामुळे मार्चच्या अखेरीस देशात …

Read More »

’पंचमवेद’ची सावरकरांना सांगितिक आदरांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती गुरुवारी (दि. 28) झाली. यानिमित्त येथील पंचमवेद या संस्थेच्या वतीने एका ऑनलाइन दृक् श्राव्य सांगितिक सोहळ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. संगीतकार व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

दोन महिन्यांनतर ‘त्या’ मायलेकरांची भेट

पनवेल : प्रतिनिधी – पालघर येथील महेश जोशी यांचा 10 वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाइकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला परत आलेले पहाताच त्याच्या आईला अश्रु आवरता आले नाहीत. आपल्या मुलाची भेट घडवून आणणार्‍या पनवेलच्या संदीप रोडे यांचे त्यांनी …

Read More »

पुण्यतिथीनिमित्त कोळखे येथील तरुणांचे रक्तदान

पनवेल : रामप्रहर वृत्त – कुटुंबातील व्यक्तीच्या पुण्यतिथीनिमित्त कोळखे येथील डॉ. विशाल पाटील व विश्वनाथ पाटील या दोन तरुणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने एक हजार …

Read More »

सोनारी गावात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील सोनारी गावाचे माजी सरपंच तथा भाजपचे महालन विभाग अध्यक्ष महेश कडू आणि सोनारी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनेश तांडेल यांनी स्वखर्चाने सोनारी गावातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने …

Read More »

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष होतोय सज्ज

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही 24 ु 7 (24 तास) तत्त्वावर कार्यरत  असणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, …

Read More »

कोकणात पाणीटंचाई; टँकरद्वारे पुरवठा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोकणात पाणीटंचाई जाणवत असून, 242 गावे व 675 वाड्यांना 132 टँकर आणि चार अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुमारे दोन लाख 20 हजार 239 नागरिकांना या पाणीपुरवठयामुळे दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यापासूनच कोकण विभागात सर्वत्र उन्हाची दाहकता जाणवू लागल्याने ज्या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई …

Read More »