Breaking News

Ankit Shah

गरज धाडसी निर्णयांची

देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि अल्पावधीतच महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना केसेसचे राज्य बनले. गेल्या दोन महिन्यांच्या काळात तर राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चाललेली दिसते आहे. अशा परिस्थितीत धाडसी निर्णय घेण्याऐवजी केंद्राकडून मदत मिळत नसल्याची खोटी ओरड करून आघाडी सरकार काय साधणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने …

Read More »

रसायनीत कोरोनाचा शिरकाव; सहा जणांना लागण

मोहोपाडा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगरवाडी येथील तीन, दुर्गामाता कॉलनी दोन, तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रसायनीत एकूण सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. …

Read More »

जेएनपीटी कस्टम हाऊस इमारतीला आग

उरण ः प्रतिनिधी – जेएनपीटी येथील पीयूबीसमोरच असलेल्या न्हावा-शेवा कस्टम हाऊस इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील केमिकल लॅबला मंगळवारी (दि. 26) दुपारी आग लागली. जेएनपीटीच्या अग्निशमन दलाच्या पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंचनाम्यानंतरच आर्थिक नुकसानीचा आकडा कळेल, अशी माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस …

Read More »

भारताच्या विकासात जेएनपीटीचे भरीव योगदान

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी आपल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी सतत नवनवीन उपाययोजना तसेच सुधारणा करीत आहे. बंदराच्या निरंतर विकास आणि विस्तारामुळे जेएनपीटीला राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडण्यास मदत झाली आहे. सध्याच्या परिस्थितीतही कोविड 19चा उद्रेक आणि लॉकडाऊनच्या आव्हानांच्या परिणामावर …

Read More »

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी; शिहूतील युवकांचा उपक्रम

पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.      डॉ. पुरुषोत्तम …

Read More »

रोहा तालुक्यात आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह

रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात पाच कोरोना रुग्ण आढळल्याची ताजी असताना आणखी आणखी आठ व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या संख्या 13 झाली आहे. मुंबई येथून 23 मे रोजी रोहा तालुक्यातील ऐनवहाळ आणि भालगाव येथे आलेल्या पाच व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्या होत्या. या व्यक्तींच्या संपर्कात …

Read More »

महाकाय ट्रेलरने रोखला मुंबई-पुणे महामार्ग

खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 26) सकाळी एक महाकाय ट्रेलर अडकला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.  अवजड वस्तू वाहून नेणारा ट्रेलर मुंबई लेनवरून पुणे लेनवर येत होता. त्या वेळी महामार्गाच्या मधील उंचवट्यावर ट्रेलरचा खालील भाग लागला आणि हा …

Read More »

मिनीडोअर, टॅक्सीचालकांना अर्थसहाय्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांना निवेदन

पेण ः प्रतिनिधी – शेअर पद्धतीने प्रवासी सेवा देणार्‍या विक्रम, मिनीडोअर, इको, टाटा मॅजिक टॅक्सीचालकांना अर्थसहाय्य मिळविण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी मागणी रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनामुळे 22 मार्चपासून शासनाने खासगी प्रवासी वाहतूक बंद केली असून त्यामुळे विक्रम चालक-मालकांना …

Read More »

रायगडात वाढती पाणीटंचाई

83 गावे, 253 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा अलिबाग ः जिमाका – रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आधीच उन्हाच्या काहिलीने त्रस्त असणार्‍या नागरिकांना या काळात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरूड आणि …

Read More »

लॉकडाऊनमध्ये कर्जतच्या तरुणांनी शोधला रोजगार; फुलवला भाजीचा मळा

कर्जत, : बातमीदार – लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे घरात बसून काय करायचे, हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. अशा वेळी नेरळजवळील तळवडे गावातील चार तरुणांनी एकत्र येत समूह शेती केली आहे. या मळ्यामधून उत्पन्न मिळू लागले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन …

Read More »