घराबाहेर न पडण्याचे तहसीलदारांकडून जनतेला आवाहन मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात प्रशासन सज्ज झाले असून, विशेषत: समुद्रकिनारी असणार्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोकण किनार्याला चक्रीवादळाचा धोका आहे. तो लक्षात घेऊन तालुक्यातील समुद्र किनारी असणार्या लोकांची …
Read More »बहुत जनांसि आधारू…
ज्यांच्या समाजकारणाची मुळेच जनकल्याणाच्या ध्यासामध्ये आहेत असे आपले सगळ्यांचे अतिशय प्रिय आणि आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर कोरली गेलेली प्रतिमा. सर्वसामान्य स्थितीत सतत माणसांमध्ये रमणारे रामशेठ आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनने ठप्प …
Read More »देवदूत
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. या महाभयंकर विषाणूने विश्व व्यापले असून, अखिल मानवजातीवर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अशा संकटकाळात काही व्यक्ती, संस्था पुढाकार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. यामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. जनतेच्या सुख-दु:खात धावून …
Read More »कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे -अॅड. महेश मोहिते
मुरुड : प्रतिनिधी – मुरुडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी प्रत्यक्ष मुरुड तहसीलदार गमन गावीत व आरोग्य विभागाशी चर्चा करताना केले आहे. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान
पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी (दि. 2) राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या माध्यमातून व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी राबविलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब भोजन या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, …
Read More »पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे आज महापालिका क्षेत्रात 16 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे मध्ये 200 रुग्णांचा टप्पा पार तर खारघरमध्ये 117 रुग्ण, नवीन पनवेल 81 आणि कळंबोलीमध्ये 93 रुग्ण झाले आहेत. पनवेल …
Read More »कर्जतमध्ये नऊ रुग्णांची कोरोनावर मात
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर मात केली असून आजच्या तारखेला 17 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्यदायी उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस 2 जून रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ असंख्य नागरिक घेत आहेत. खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच भाजपचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या …
Read More »रायगडात 42 रुग्ण वाढले
पनवेल : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 30) कोरोनाच्या 42 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 33 रुग्ण पनवेल तालुक्यातील आहेत. याशिवाय अलिबाग चार, माणगाव दोन, तर उरण, खालापूर व रोहा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल तालुक्यात महापालिका हद्दीत 23 आणि ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळले …
Read More »जिल्हा रुग्णालयातील दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण
अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात काम करणार्या दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांची संख्या सहा झाली आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत अलिबागमध्ये 50च्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper