Breaking News

Ankit Shah

पनवेल बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन

काँग्रेसची यात्रा थांबविण्याची मागणी; निवदेन सादर पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून शुक्रवारी (दि. 18) पनवेलमध्ये शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधी यांच्या फोटोला …

Read More »

आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाण्यात कारवाई; दोन आरोपी जेरबंद पनवेल ः वार्ताहर ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड या ठिकाणी दोन हजार रुपये चलनी दराच्या तब्बल आठ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखा-5कडून ही कारवाई करण्यात आली. ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड, गायमुख …

Read More »

महिला लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवित आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग यश संपादन करून ऋचा दरेकर या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणीने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऋचा हिचा शनिवारी (दि. 12) सत्कार …

Read More »

करंजाडेतील शेकापला गळती सुरूच; कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात गळती लागली असून करंजाडे येथील लालवाडीतील शेकाप कार्यकर्ते असलेल्या आदिवासी बंधू-भगिनींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 12) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या …

Read More »

अलिबागच्या लाचखोर तहसीलदारांकडे आढळले घबाड; झडती सुरूच

अलिबाग ः प्रतिनिधी लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे तब्बल 60 तोळे सोने आढळले आहे. त्याचप्रमाणे 18 हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या मुंबई येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तेथेही घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील टेंभोडे येथे ओपन जिम

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत असून नागरिकांना विविध सुविधा मिळत आहेत. त्या अंतर्गत टेंभोडे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे …

Read More »

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांची रंगत

-समाधान पाटील, पनवेल रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. शहरांमध्ये मनोरंजनाची अनेक साधने वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. गाव-खेड्यात मात्र ठराविक काळात अशी रंगत असते आणि म्हणूनच जत्रा त्यांच्यासाठी खास ठरते. खरीप हंगाम संपून शेतकर्‍यांचे सुगीचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते जत्रांचे. हल्ली निसर्गाचे चक्र …

Read More »

गुरू नानक जयंतीनिमित्त कळंबोलीत विशाल नगर कीर्तन

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त बंधू भाव, एकात्मता सलोखा आणि शांततेचा संदेश देणारे तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 533वी जयंत्ती मंगळवारी (दि. 8) आहे. त्यानिमित्त रविवारी कळंबोली गुरुद्वाराच्या वतीने विशाल नगर किर्तनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …

Read More »

पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे पतीची आत्महत्या

पनवेल : वार्ताहर कामोठ्यातील एका नवविवाहितेने प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला प्रियकराच्या मदतीने मानसिक त्रास दिल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी नवविवाहिता व तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील मृत पतीचे नाव पलाश रघुवंश बिरेंद्रप्रताप सिंग …

Read More »

पनवेलमधील साई वर्ल्ड सिटी प्रकल्प पूर्ण

मान्यवरांच्या उपस्थितीत 800 रहिवाशांना चावी सुपूर्द पनवेल : प्रतिनिधी पॅराडाईज ग्रुप साई वर्ल्ड सिटी फेज ’वन’च्या यशस्वी पूर्ततेनंतर 800 भाग्यवान रहिवाशांसाठी चावी-हँडओव्हर समारंभाला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व लोकनेते रामशेठ ठाकुर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) उपस्थित राहून  पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक तथा साईभक्त मनीष भातिजा यांना शुभेच्छा …

Read More »