Breaking News

Ankit Shah

नवी मुंबईत भाजपचा जनतेशी संवाद

आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार पदाधिकारी व नागरिकांमधील बैठकांना सुरुवात नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आगामी नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार सामान्य जनता आणि भाजप प्रमुख पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठका सुरू झाल्या आहेत. नेरुळमधील प्रभाग क्र. 34 मध्ये भाजप कार्यकर्ते आणि जनतेची समनव्य बैठक …

Read More »

सूडबुद्धीचा गजर

शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानांवर गुरूवारी ईडीचे छापे पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पित्त खवळणे स्वाभाविकच होते. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यानंतर नेहमीप्रमाणे सूडबुद्धीच्या कारवाईचा राग आळवला. मविआ नेत्यांना आता असे म्हणण्याची सवयच जडली आहे. ईडीची कारवाई होताक्षणी त्यांचा सूडबुद्धीच्या कारवाईचा गजर सुरू होतो. महाराष्ट्राच्या …

Read More »

उरण तालुक्यातील काही गावांत पूरपरिस्थितीचा धोका

पालकमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी उरण : वार्ताहर पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तरीही काही ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपे यांची साफसफाई केली नाही. सिडकोने सिडकोबाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांची साफसफाई केली नाही तसेच खाडी किनार्‍यावरील होर्डींग पाईपची साफसफाई केली नाही. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी तालुक्यातील …

Read More »

खारघरमध्ये होणार दैनिक बाजार विकसित

सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती  हर्षदा अमर उपाध्याय यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये  दैनिक बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झालेले खारघर, सेक्टर 12 मधील 876.14 चौ.मी क्षेत्रफळ  असलेला  उ-46 क्रमांकाचा भूखंडावर दैनिक बाजार …

Read More »

आंबे खरेदी करताना सावधान!

उरणमध्ये खराब फळाची विक्री; ग्राहकांची फसवणूक; आरोग्यही धोक्यात उरण : प्रतिनिधी उन्हाळी मोसम म्हणजे जांभळे, करवंदे, फणस आणि फळांचा राजा हापूस आंबा या रानमेव्याने ओथंबून गेलेला हंगाम याला उरण बाजारपेठ अपवाद नाही. कोणताही माल ग्राहकांच्या माथी मारण्यात तरबेज असणारे काही विके्रते बेमालूमपणे आंब्याची विक्री करत आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेला हा …

Read More »

बेलापूरमधील बहुमजली वाहनतळ प्रगतिपथावर

आयुक्तांकडून प्रकल्पस्थळांची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरू असून सदर कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. बुधवारी (दि. 25) आयुक्तांनी सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स …

Read More »

उत्पादन घटल्यामुळे टोमॅटो महागले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर 40 ते 80 रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव 90 ते 100 रुपये झाले आहेत. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या टोमॅटोची असते. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित …

Read More »

कोपरी उड्डाणपुलाला भाजपचा विरोध

काम थांबविण्यासाठी आमदार गणेश नाईकांचे पालिका आयुक्तांना पत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलाचे काम रद्द करून अनावश्यक कामांवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. या संदर्भात नवी मुंबई भाजपच्या …

Read More »

केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना घरगुती एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली. याशिवाय वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेत उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला

मुरूड ः प्रतिनिधी सुटीचा शेवटचा हंगाम असल्याने मागील दोन दिवसांपासून मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. हॉटेल व लॉजमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने समुद्रकिनारी रस्त्यावर ट्रॅफिक पहावयास मिळाले. उंटस्वारी व घोडागाडीचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक दिसत होते. स्वतःची वाहने घेऊन आलेल्या पर्यटकांची बेसुमार गर्दी जंजिरा किल्ला पहावयास …

Read More »