जनादेशाला धुडकावून मागल्या दाराने सत्ता काबीज करणार्या महाविकास आघाडीतील हेवेदावे, भांडणे आणि धुसफूस आता पृष्ठभागावर येऊ लागली आहे. हे सरकार स्वत:तील अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वीच केले होते. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कुणीही प्रयत्न करण्याची गरजच उरलेली नाही. गेल्या आठ वर्षांत संपूर्णपणे विलयाला गेलेली …
Read More »कचरामुक्त शहर स्पर्धेसाठी कर्जत नगर परिषद सज्ज
कर्जत : बातमीदार केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरातील कचर्याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून दोनदा कचरा उचलणे तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यांना जीपीआरएस यंत्रणेने जोडणे ही सर्व कामे करण्यावर कर्जत नगर परिषदेने भर दिला आहे. …
Read More »रोह्यात काळा, लाल भाताचे प्रयोग यशस्वी
खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले रोहे : प्रतिनिधी नवे तंत्रज्ञान,समाधानकारक पाऊस, शेतीतील प्रयोग, योग्य नियोजन व शेतकर्यांची मेहनत यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात या वर्षी लाल व काळ्या पौष्टिक भाताचे उत्पादन व सेंद्रिय पध्दतीने घेण्यात आले आहे. रोहा तालुक्यात गेल्या खरीप …
Read More »माथेरान रेल्वे स्टेशनजवळ आग
माथेरान : प्रतिनिधी माथेरान स्टेशन जवळलील नगरपालिका चाळीलाच्या परिसरात मंगळवारी (दि. 29) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वित्तहानी झाली पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन …
Read More »गुरे चोरून नेणार्या गाडीला अपघात
दोन गुरांची सुटका;नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार दोन गायींना पळवून नेणार्या जीपला कर्जत तालुक्यातील बाटलीचीवाडी येथे अपघात झाला. गुरांना बेशुद्ध करून चोरून नेणार्या गाडीचा चालक आणि अन्य एकाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिवंडी तालुक्यातील कोन गावातील बळवंत सुळे यांच्या मालकीची टाटा कंपनीची जीप (एमएच-43, व्ही-5593) कर्जत-मुरबाड …
Read More »वावोशी परिसरात दोन घरफोड्या; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा येथे दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व 35 हजार रोख रक्कम तसेच पार्लरचे सामान चोरुन पोबारा केला. वावोशी फाटा येथील राजेंद्र जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे …
Read More »आंबोली धरणाच्या कालव्यांची कामे रखडली; शेतकरी नाराज
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आंबोली धरणाच्या उजव्या व डाव्या तीर कालव्यांची कामे सात वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद आहेत. त्यामुळे हजारो लाभार्थी शेतकरी नाराज आहेत. लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले आंबोली धरण मुरूडपासून सहा किमी अंतरावर असून या मातीच्या धरणाची लांबी 518 मीटर, उंची 32.09 मीटर आहे. आंबोली धरण प्रकल्पासाठी 29 …
Read More »वलप ग्रामस्थांना तिर्थयात्रेची भेट
पनेवल ः रामप्रहर वृत्त वलप ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना राजेश पाटील यांच्यामार्फत तिर्थयात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले होते. मात्र गेल्या महिन्यापासून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने मंदिरे खुली झाली आहेत. त्याअनुषंगाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक उपक्रम …
Read More »दिघोडे येथे ट्रेलरने घेतला पेट
उरण ः वार्ताहर दिघोडे येथे रानसई धरणाकडे जाणार्या एका ट्रेलरने मंगळवारी (दि. 29) दुपारी अचानक पेट घेतला. जवळच असणार्या एका यार्डमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत ट्रेलरला लागलेली आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिघोडे येथील रानसई धरणाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या …
Read More »उभा सरसगड वणव्यात होरपळला
सजीवसृष्टी व वनसंपदा झाली बेचिराख पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक सरसगडावर सोमवारी (दि. 28) रात्री पुन्हा मोठा वणवा लागला. त्यात वनसंपदा व प्राणी, पक्षी बेचिराख झाले. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वत्र लागणार्या वणव्याने वनसंपदा उद्ध्वस्त होत आहे. सरसगडावर सोमवारी रात्री लागलेला वणवा मोठ्या प्रमाणात भडकला होता. या वणव्यात मोठी वनसंपदा, जीवसृष्टी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper