Breaking News

Ankit Shah

देऊळवाडीतील वाचनालयात चोरी

उरण ः बातमीदार शहरातील देऊळवाडी येथे असलेल्या श्री गोपाळकृष्ण वाचनालयात सोमवारी (दि. 28) रात्री चोरी झाली. चोरी झाल्याचे मंगळवारी (दि. 29) सकाळी वाचनालय कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. वाचनालयाच्या लेखनिक वृषाली पाठारे या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता वाचनालय उघडण्यास इतर कर्मचार्‍यांसह गेल्या होत्या. वाचनालयाला मुख्य दोन खोल्या आहेत. एका खोलीचे …

Read More »

पुढचा नंबर हसन मुश्रीफांचा!

भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी भ्रष्टाचार्‍यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट …

Read More »

सावित्रीबाई फुले पुरस्काराने प्रतिष्ठित महिलांचा सन्मान

पनवेल ः वार्ताहर महिला दिनाचे औचित्य साधून क्रियाशील प्रेसक्लब पनवेलतर्फे ’एक दिवस तिचा’ हा कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. यानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांना सावित्रीबाई फुले 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर महिला पोलिसांना हळदीकुंकू व साडी देण्यात आली. या वेळी परिमंडळ-2मधील महिला …

Read More »

नवी मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

61 चालकांकडून 58 हजार रुपयांचा दंड वसूल नेरुळ ः प्रतिनिधी नवी मुंबई शहरातील विविध कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांनादेखील आर्थिक दंडाची झळ बसली. या कारवाईत एकूण 61 जणांवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिली. राज्याचे परिवहन …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक अंकी

चाचण्यांवर भर; आतापर्यंत 13 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या एक अंकी झाली आहे. निर्बंध शिथिल करून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे असले तरी पुन्हा चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिका प्रशासनाकडून दैनंदिन चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात 12 लाख …

Read More »

हवेत बांधलेली घरे

महाराष्ट्राच्या विधिमंडळात जनतेच्या सेवेत गुंतलेल्या आमदारांसाठी कायमस्वरूपी 300 घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली, परंतु त्यातील फोलपणा लगेचच उघड झाला हे बरेच झाले. महाराष्ट्रातील काही आमदारांना मुंबईत घरे मिळत नाहीत ही वस्तूस्थिती आहे, परंतु घराची खरोखर निकड असलेल्या अशा आमदारांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी …

Read More »

पेणमधील वीज कर्मचारी संपावर

पेण : प्रतिनिधी ऊर्जा सचिव व महावितरणचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने राज्य वीज कमर्चारी, अधिकारी व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने 28 व 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरणच्या पेण कार्यालायातील कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी कामगार सोमवारी संपावर गेले. एसईए संघटनेचे रायगड जिल्हा सहसचिव …

Read More »

संपकरी महसूल कर्मचार्‍यांचे रक्तदान

राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 28) राज्य सरकारविरोधात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. या वेळी संपकरी कर्मचार्‍यांनी रक्तदान करून आपला निषेध नोंदवला. रायगड जिल्ह्यातील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच तहसील, भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, शिपाई मिळून 450 …

Read More »

विझ किड्स प्री स्कूलच्या फन फेअरचे उद्घाटन

  पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 5 येथे विझ किड्स प्री स्कूलच्या फन फेअरचे उद्घाटन भाजपच्या उलवे नोड महिला मोर्चाच्या अध्यक्ष योगिता भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उलवे नोडच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सुजाता पाटील, सुमन पाटील, विझ किड्स प्री स्कूलच्या प्रिन्सिपल नम्रता साने, टीचर दीक्षा नगदिवे, …

Read More »

पनवेलमध्ये कोविड योद्ध्यांना प्रशस्तीपत्रक

पनवेल ः प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टर्स, एएनएम, जीएनएम, वॉर्डबॉय, डाटा एन्ट्री ऑपरेटर या कोविड योद्ध्यांना मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वाटप गुरुवारी (दि. 24) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले. दोन वर्षांपासून कोविड काळात आपल्या जीवाची …

Read More »