भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त खारघर रेल्वे स्टेशनबाहेरील भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या खारघर मधील कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत रविवारी (दि. 20) या भुयारी मार्गामधील …
Read More »खारघरमध्ये शाश्वत फाउंडेशनतर्फे होळी मिलन आणि हास्य कविसंमेलन
पनवेल : प्रतिनिधी होळी निमित्त खारघर येथे शनिवारी शाश्वत फाउंडेशन आयोजित होळी मिलन आणि हास्य कविसंमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी कवींनी आपल्या विनोदी कवितातून पर्यावरण जागृतीचा संदेश उपस्थितांना दिला. खारघर सेक्टर 19मध्ये शाश्वत फाउंडेशनच्या बिना गोगरी व जयेश गोगरी यांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी होळीनिमित्त होली मिलन आणि …
Read More »सत्याग्रह महाविद्यालयात सत्याग्रह सप्ताह
उद्या पदवीदान समारंभ नवी मुंबई : प्रतिनिधी खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्याग्रह सप्ताह सुरू आहे. यात जाहीर परिसंवाद, व्याख्यानमाला, एक शाम सत्याग्रह के नाम आदी समारंभात सुरू आहे. रविवारी (दि. 20) सकाळी सीबीडी येथील सम्राट अशोक महाविहारातून महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह ज्योत घेऊन उपासक सुंदर …
Read More »नवीन पनवेलमध्ये साहित्य वसंतोत्सव
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्य साधना या समूहाच्या वतीने साहित्य वसंतोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेलमधील सिडको उद्यानातील खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग रहिवासी संघाचे अध्यक्ष केशव राणे व पदाधिकारी तसेच रॉयल एज्युकेशन असोसिएशनच्या संस्थापक नाजनीन पालेकर, जाकीर पालेकर आदी उपस्थित होते. समूहाचे प्रवर्तक …
Read More »12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण वेगवान करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांची माहिती नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 12 ते 14 वयोगटांतील लसीकरणास 16 मार्चपासून प्रारंभ झाला. या वयोगटातील मुलामुलींचेही वेगवान लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. 16 मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे, परंतु शहरातील केंद्र …
Read More »नवी मुंबई लवकरच ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत
आठ महिन्यांत सर्वत्र कॅमेरे; कंपनीकडून कामाला सुरुवात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून पुढील आठ महिन्यांत संपूर्ण शहर 1500 सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या नजरेत येणार आहे. या कामी आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रयत्न केले होते. सीसीटीव्हीच्या 154 कोटींच्या कामासाठी 274 कोटींची निविदा …
Read More »दडवून ठेवलेल्या फाइल्स
दशकानुदशके काश्मीरमधील सत्य दडपले गेले अशा प्रतिक्रिया आपण अनेक ठिकाणी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पाहिलेल्या असतील, परंतु त्याचा नेमका अर्थ ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रभावीपणे सांगतो. असे चित्रपट मोठ्या संख्येने निर्माण व्हायला हवेत असे उद्गार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले याला फार मोठा अर्थ आहे, कारण नरेंद्र मोदी नावाच्या …
Read More »‘नवलाईफ जेनेरिक्स’च्या आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे नवलाईफ जेनेरिक्स व डॉक्टर राहूल वडके क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने तर शर्मिला एस. यांच्यातर्फे रविवारी (दि.13) आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, वजन, उंच अशा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा परिसरातील …
Read More »सी-लिंकबाधित मच्छीमारांच्या हाती पुन्हा निराशाच
नुकसानभरपाई देण्याबाबतच्या दुसर्या बैठकीतही निर्णय नाही उरण : प्रतिनिधी न्हावा-शिवडी सी-लिंकमुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील 789 मच्छीमारांच्या नुकसान भरपाईच्या मुद्यावर सोमवारी (दि. 14) बोलवण्यात आली होती, मात्र या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आणखी 15 एप्रिलपर्यंत मुदत मागितली आहे. न्हावा ग्रामपंचायतीच्या …
Read More »कामोठ्यातील पाणीप्रश्नी भाजप आक्रमक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर काढणार मोर्चा पनवेल ः वार्ताहर कामोठे वसाहतीला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने तेथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. या पाणी प्रश्नावरून सोमवारी (दि.14) भाजप नगरसेवक विजय घरत, विजय चिपळेकर व सहकारी कामोठे वसाहतीमधील सिडको कार्यालयात आक्रमक झाले. पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper