Breaking News

Ankit Shah

‘मविआ’तील खदखद

कोरोना महामारी काही थांबायचे नाव घेत नाहीये. हा संसर्ग वारंवार डोके वर काढत आहे. कोरोनाप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सातत्याने कुरबुरी होत आहेत. त्यावर आघाडीतील नेते तात्पुरती मलमपट्टी करीत असले, तरी तीन पक्षांतील कार्यकर्ते मात्र ऐकायला तयार नाहीत, हे ठाण्यातील घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. भिन्न विचारधारा आणि परस्परविरोधी ध्येय-धोरणे …

Read More »

2022मध्येही कमाईची संधी देण्याची भारतीय बाजारात क्षमता!

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com भारतीय बाजार एकतर्फी वर जाताना दिसत असला तरी तो या वर्षभरात याच वेगाने वर जाण्याची शक्यता नाही. अर्थात, काही घटना अशा घडत आहेत की तो आता फार खाली येण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना 2021 सारख्या संधी 2022 मध्येही मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच माझ्या मोबाईलसाठी मी एक …

Read More »

एलआयसीचा आयपीओ अनेक विक्रम करण्यास सज्ज

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com येत्या एक फेब्रुवारीला सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प आणि त्या पाठोपाठ देशातील सर्वात मोठा ठरू शकेल असा एलआयसीचा येणारा आयपीओ, या मोठ्या आर्थिक घटना आहेत. एलआयसीच्या आयपीओने सरकारी तिजोरीत चांगली भर तर पडेलच, पण गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याची क्षमता असलेल्या कंपनीत गुंतवणुकीची एक संधी मिळेल. भारतातील …

Read More »

दंडेलशाहीला धक्का

विधिमंडळातील 12 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाविकास आघाडी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. या अन्याय्य निलंबनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी सध्या माननीय न्यायालयासमोर सुरू आहे. सुनावणी अद्याप पूर्ण झाली नसली, …

Read More »

शाळांवर संकट

महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चक्रावून टाकणारे आहेत. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. तथापि, हे निर्बंध पूर्वीइतके कडक नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. उपाहारगृहे, दुकाने, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे अशा सर्व ठिकाणी 50 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. बाकी सगळे व्यवहार बव्हंशी …

Read More »

गुंतवणूक जीवन विम्यापेक्षा वेगळी का आहे?

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com जानेवारीपासून अनेक जण करबचतीचा विचार करतात आणि त्यासाठी जीवनविमा काढतात. त्यातून करबचत होत असली तरी दीर्घकाळ विमा हप्ता भरण्याची बांधिलकी घेतली जाते. ज्या जीवनविम्यातून पुरेसा परतावा मिळत नाही त्याला गुंतवणूक म्हटले जाते, पण गुंतवणूक ही जीवनविम्यापेक्षा वेगळी आहे आणि ते याच काळात समजून घेतले पाहिजे. जानेवारी …

Read More »

गुंतवणूक केली, पण तिच्या नोंदींचे काय?

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com बँक खाती, जीवनविमा, म्युच्युअल फंड आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये सुमारे 82 हजार कोटी रुपये असे पडून आहेत, अशी एक आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. याचा अर्थ कोट्यवधी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीची पुरेशी काळजी घेत नाहीत असा होतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर होऊन त्याच्या नोंदी करण्याची सवय लावून घेणे, एवढाच हे …

Read More »

शेजार्याची डोकेदुखी

माणसाला एकवेळ स्वतःचा जोडीदार निवडता येतो, पण शेजारी निवडता येत नाही. तो नशिबात असेल तसा स्वीकारावा लागतो अशा आशयाची इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे. त्याचा अनुभव गेली पन्नासहून अधिक वर्षे भारताने घेतला आहे. आपला शेजारी चीन याच्या रूपाने एक जुनी डोकेदुखी पुन्हा एकदा ठणकू लागली आहे असे दिसते. गेल्या दीड …

Read More »

गुळसुंदे ग्रामपंचायतीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे व ग्रामस्थ अमोल जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या कोरोना योद्ध्यांचा पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कम देऊन सोमवारी (दि. 3) सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच हरेश बांडे, …

Read More »

महापौर सहाय्यता निधीतून मदत मंजूर

पनवेल मनपा हद्दीतील दोघांना लाभ पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील रहिवाशी असणार्‍यांना वैद्यकीय कारणासाठी महापौर निधीतून मदत देण्यात येते. सोमवारी (दि. 3) झालेल्या महापौर सहाय्यता निधी समितीच्या बैठकीत दोन लाभार्थ्यांना मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधी समितीची बैठक सोमवारी …

Read More »