Breaking News

Ankit Shah

व्यापार्यांना दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी -नगरसेविका नेत्रा पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी व्यापारी वर्गाला दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्या, अशा मागणीचे निवेदन पनवेल मनपा आयुक्तांना दिले आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्या प्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉक 5 ची घोषणा नुकतीच जाहीर केली त्यानुसार जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय यांना …

Read More »

सुरेश पाटील यांच्या दणक्याने अतिक्रमणविरोधी पथक जासईतून माघारी

उरण : रामप्रहर वृत्त – जासई येथे उरण-बेलापूर रेल्वे अतिक्रमण निमित्ताने शनिवारी (दि. 3) सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक आले होते. या वेळी न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या व दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा जाब परखडपणे विचारला तसेच मागण्या पूर्ण करा आणि मगच या, …

Read More »

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये बनताहेत सिमेंट काँक्रीटचे रस्ते

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सहकार्य; ‘टीआयए’चा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर – तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)च्या पाठपुराव्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्णतः होण्यास सुरूवात झाली असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे टीआयएने सांगितले आहे. येथील काँक्रीट रस्ते टिकाऊ आणि सुरक्षित आहेत.  रुटींग, क्रॅकिंग, स्ट्रिपिंग, पोत खराब …

Read More »

नवी मुंबईतील वाहनांना टोल दरवाढ करू नये -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : बातमीदार – राज्य शासनाने नुकताच मुंबईमध्ये येणार्‍या वाहनांना पाच ते 25 रुपये पर्यंतची टोल दरवाढ केलेली आहे. नवी मुंबई ही मुंबईला लागूनच असल्याने व नवी मुंबईतील वाहने दररोजच मुंबईला ये-जा करीत असल्याने ही टोल दरवाढ नवी मुंबईतील वाहनांना लागू करू नये असे निवेदन बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा …

Read More »

भाजयुमोतर्फे नवी मुंबईत विविध उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनील कृष्णा सुतार यांच्यावतीने  नेरुळ सेक्टर, 4 येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  नवी मुंबई शहराला स्वच्छतेचा देशपातळीवर पुरस्कार मिळवून देणार्‍या पालिकेच्या सफाई करणारे कामगारांचा त्याचप्रमाणे …

Read More »

गणित बोनस शेअर्सचे!

शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्सविषयी अनेक समज गैरसमज आहेत, अशा बोनस शेअर्सचे गणित आपण समजून घेऊ यात. दिवाळी म्हटलं की बाकीच्या सर्व गोष्टींबरोबर नोकरवर्गाची एक हक्काची गोष्ट म्हणजे बोनस. कामगारांना आधी दर आठवड्याला पगार (वेजेस) मिळायचा. वर्षातून 52 आठवडे, परंतु मासिक पगार ही पद्धत चालू झाल्यावर 12 …

Read More »

आर्थिक सहभागीत्व वाढेल, ते गुंतवणुकीच्याच मार्गाने

भारतीय अर्थव्यवस्थेत परस्परविरोधी अशा अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. कोरोना संकटाचा संभ्रम अजून संपला नसताना या गोष्टींकडे आधी जागरूक भारतीय नागरिक म्हणून आणि नंतर एक गुंतवणूकदार म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे. कोरोनासाथीसोबत आपल्याला दीर्घकाळ जगावे लागणार आहे, हे आता अगदी स्पष्ट झाले आहे. हे संकट किती लांबेल, याची …

Read More »

एल अॅण्ड टी कंपनीकडून शेतकर्यांना नुकसानभरपाई

पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील धामणदिवी गावालगत महामार्गावर 9 आणि 10 जुलै रोजी दरड कोसळल्यानंतर त्याचा मलबा एल अ‍ॅण्ड टी ठेकेदार कंपनीकडून लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनींमध्ये टाकण्यात आला होता. या संदर्भात ठेकेदार कंपनीकडून धामणदिवी येथील नऊ दरडग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचे सानुग्रह वाटप करण्यात आले. लवकरच शेतजमिनीचीही साफ …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्यांकडून मागण्यांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन

मुरूड : प्रतिनिधी – राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मुरूडचे तहसीलदार गमन गावीत यांना निवेदन सादर करण्यात आले.  या वेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष रीमा कदम, नायब तहसीलदार गोविंद कौटंबे, वनिता पाटील, सुग्रीव वाघ, सुमित उजगरे, राजू भोय, …

Read More »

पतीच्या निधनानंतर आठवडाभरात पत्नीचाही मृत्यू

कर्जत : बातमीदार – आंबेडकरी चळवळीत काम करणारे नेरळ येथील कार्यकर्ते लक्ष्मण जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांतच त्यांच्या पत्नी कलावती यांचीही कोरोनाच्या संसर्गाने जीवनयात्रा संपली. या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. लक्ष्मण जाधव यांचे 13 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेे. निधनानंतर त्यांचे …

Read More »