Breaking News

Ankit Shah

पनवेलमध्ये 154 नवे पॉझिटिव्ह

21 रुग्णांचा मृत्यू; 314 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.5) कोरोनाचे  154 नवीन रुग्ण आढळले असून 21 जणांचा  मृत्यू झाला आहे, तर 314 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 121 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला व 255 रुग्ण बरे झाले. …

Read More »

ऑनलाइन शिक्षणात सीकेटी विद्यालय अग्रेसर

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणुच्या संसर्गातून पसरत चाललेल्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या लाटेने जगभरातील शाळा खरं तर बंद करण्यात आल्या होत्या. परिक्षा रद्द झाल्या लॉकडाऊन सुरू झाला सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. परंतु या बिकट परिस्थितीतही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणात खंड पडू नये म्हणून केवळ एक …

Read More »

खांदा कॉलनीतील नादुरुस्त पथदिवे तातडीने चालू करा -नगरसेवक संजय भोपी

पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा कॉलनी वसाहतीमधील नादुरुस्त पथदिवे तात्काळ दुरुस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट व नवीन विजदिवे लावण्यात यावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिका नगरसेवक व प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन …

Read More »

कोरोना काळात सलग 100 दिवस धावण्याचा पराक्रम

खारघर : प्रतिनिधी – कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या चांगल्या स्वास्थासाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा परिस्थिती कोरोनाच्या काळात सलग 100 दिवस धावून महाड आद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झंजे यांनी अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून दररोज 7 ते 10 किमीचे अंतर …

Read More »

‘लायन्स’तर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझर

पनवेल : रामप्रहर वृत्त – लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट नवी मुंबईच्यावतीने ऑक्टोबरमधील पहील्या आठवड्यात विविध उपक्रम राबविले जातात. 2 ऑक्टोबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ’करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस’ येथे आपलं घर समजून राहणारे वृद्ध यांना तसेच कोविडच्या काळात जिवाची बाजी लावणारे पोलीस कर्मचारी यांच्यासाठी मास्क व …

Read More »

कर्नाळा खिंडीजवळ गॅस टँकर पलटी; क्लिनर जखमी

पनवेल : वार्ताहर – पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गाजवळील कर्नाळा खिंडीजवळ एक गॅस टँकर पलटी झाल्याने काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती, तर सदर टँकरचा क्लिनर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले आहे. पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे गॅस टँकर येत असताना एका वळणावर अचानकपणे टँकरचालकाचा ताबा सुटून हा …

Read More »

दुर्गंधीयुक्त वायू सोडणार्या तळोजा येथील कंपन्यांवर कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर – तळोजा औद्योगिक क्षेत्रात असणार्‍या विविधप्रकारच्या मच्छी कंपन्यांच्या कचर्‍यापासून पावडर बनवली जाते. त्या कंपनीच्या धुरांड्यातून निघणार्‍या वायू व दुर्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांसह येथील कामगारवर्गाचे आरोग्य धोक्यात आले असून सदर कंपन्यांविरुद्ध प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सर्दी, खोकला, ताप आला …

Read More »

पनवेलमध्ये 263 नवे कोरोनाबाधित

14 जणांचा मृत्यू; 189 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 3) कोरोनाचे 263 नवीन रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 189 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत दिवसभरात 222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 129 रुग्ण बरे …

Read More »

श्वान निर्बीजीकरण व लसीकरण केंद्र; उरण नगर परिषदेकडून उभारणी

उरण : वार्ताहर – उरण शहरात भटक्या कुत्र्यांचा (श्वान) नागरिकांना त्रास होत असे विशेषता वृद्ध नागरिकांना, महिलांना, लहान मुले, दुचाकी वाहने चालक आदींना भटक्या कुत्र्यांमुळे जास्त त्रास होत असे या गंभीर समस्यांचा विचार करून उरण नगरपरिषद यांनी भटक्या कुत्र्यांसाठी (श्वान) निर्बीजीकरण व लसीकरण केंद्राची उभारणी केली आहे. हे केंद्र व …

Read More »

वापरलेले मास्क, रबरी हातमोजे टाकले रस्त्यात

स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात पनवेल : वार्ताहर – वापरलेले मास्क आणि रबरी हातमोजे रस्त्यावर टाकण्याचे प्रकार नवीन पनवेल परिसरात वाढले असून, त्यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी पनवेल महापालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत. कोरोनाचा भयानक काळ चालला असून, सर्वांनी सुरक्षित …

Read More »