Ramprahar News Team

हॉलिबॉल स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता

खारेपाट : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील जय बहिरीदेव संघ बहिरीचापाडा आयोजित जिल्हास्तरीय हॉलिबॉल टाकाटाकी स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता ठरला, तर उपविजेता बहिरीदेव संघ बहिरीचापाडा, तृतीय संघ नांदाईचा पाडा संघ, चतुर्थ क्रमांक जय बहिरीदेव संघ ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट शूटर-सुधाकर पाटील बहिरीचापाडा, विजय म्हात्रे दादर-पेण यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघ …

Read More »

विराट आणि रोहितला सौरवचं रेकॉर्ड मोडण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधलं सध्याचं वातावरण आणि खेळपट्ट्या बघता इथली परिस्थिती बॅट्समनना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या अशाच राहिल्या, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सौरव गांगुलीचं 20 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. प्रत्येक चार वर्षांनंतर होणार्‍या क्रिकेट …

Read More »

पक्षी-प्राणी गणनेसाठी कर्नाळा अभयारण्यात ट्रॅक कॅमेरे

पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा अभयारण्यातील पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यातील विविध भागात ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले होते. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यजीव विभागामार्फत पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. पनवेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी …

Read More »

मुरूडमध्ये पर्यटकांची अलोट गर्दी; समुद्रकिनारे गजबजले

मुरूड-जंजिरा ः प्रतिनिधी शनिवारी बुद्धपौर्णिमेची आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी साधून हजारो पर्यटक मुरूड, काशीद समुद्रकिनारी येऊन धडकले आहेत. शनिवारपासूनच पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पर्यटकांनी स्वतःच्या चारचाकी गाड्या घेऊन येणे अधिक पसंत केले. त्यामुळे मुरूडच्या समुद्रकिनारी असणार्‍या लॉजेसभोवती गाड्यांची गर्दी दिसून आली. मुरूडसह काशीद समुद्रकिनाराही शेकडो पर्यटकांनी …

Read More »

देवाकडे मी कधी काही मागत नाही ; 18 तासांच्या ध्यानधारणेनंतर मोदी यांची प्रतिक्रिया

रुद्रप्रयाग ः वृत्तसंस्था निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.19) सकाळी मीडियाशी संवाद साधला. जवळपास 17 ते 18 तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदी यांनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. बर्‍याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असे या वेळी मोदी …

Read More »

मावळमधील जाधववाडी धरणात बुडालेल्या सहा जणांपैकी तीन मृत्युमुखी

मावळ ः प्रतिनिधी उन्हाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यातील उर्वरित तिघांना एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. प्रशील आढाव (7), अनिल कोळसे (58) आणि प्रितेश  आगळे (32, तिघेही रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस …

Read More »

रायगडात ‘रोहयो’तील रोजगार निर्मितीचे 90 टक्केउद्दिष्ट पूर्ण

अलिबाग ः प्रतिनिधी रोजगार हमी योजनेत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. यंदा दोन लाख 38 हजार 993 मनुष्य दिवस रोजगारनिर्मिती करण्यात आली. फळबाग लागवड योजनेसह अन्य योजनाही ‘रोहयो’त जोडल्यामुळे रायगडात ‘रोहयो’ला चांगला प्रतिसाद लाभला आहे.    जिल्ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत 2018-19 साठी …

Read More »

अखेरच्या टप्प्यात 60.21 टक्के मतदान ; बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.21 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या वेळी 7.27 कोटी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 3.47 कोटी महिला तसेच तीन हजार 377 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक …

Read More »

होय, मी समलैंगिक आहे -द्युती चंद

ओडिशा : वृत्तसंस्था भारताची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खुलासा केला. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मात्र तिने मैत्रिणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच …

Read More »

…तर गेलच्या नावावर होऊ शकेल हा नकोसा असलेला विक्रम

मुंबई : प्रतिनिधी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातील सर्वाधिक स्फोटक फलंदाजाची फौज विंडीज संघात आहे. त्यात एक नाव आघाडीवर आहे आणि ते म्हणजे ख्रिस गेलचे… वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने चौकार-षटकारांची आतषबाजी करताना राष्ट्रीय संघात दमदार पुनरागमन केले होते. …

Read More »