Breaking News

Ramprahar News Team

लालूप्रसाद यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

पाटणा : वृत्तसंस्था चारा घोटाळाप्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादवांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले असून त्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. गेले 24 महिने ते तुरुंगात आहेत. लालूप्रसादांच्या जामिनाची मागणी करणार्‍या अर्जाला फेटाळताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केले …

Read More »

मोदी पुन्हा सत्तेत आले, तरच भारतासमवेत चर्चा शक्य -इम्रान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारतात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वक्तव्य केले आहे. जर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुन्हा सत्तेत आल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेवर चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे, मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शांततेच्या मुद्द्यावर चर्चा करणे अशक्य असून ते पाकसोबत …

Read More »

गर्दीच्या वेळेत दरवाजा अडवणार्‍यांवर कडक कारवाई करा; प्रवासी संघटनांची मागणी

डोंबिवली ः प्रतिनिधी गर्दीच्या वेळेत लोकलमधील दरवाजे अडवल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केला होता, पण ती अडचण केवळ दिवा स्थानकातील प्रवाशांची नसून बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कळवा आदी स्थानकांमधील प्रवाशांचीही आहे. त्यासाठी दरवाजा अडवणार्‍या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या …

Read More »

पवारांकडून जातीचे राजकारण : आढळराव-पाटील

पुणे ः प्रतिनिधी माझ्या 15 वर्षांच्या खासदारकीच्या काळात कोणाचीही जात काढली नाही, पण शरद पवार हे जातीचे राजकारण करतात, अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आढळराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल उमेदवारी अर्ज दाखल …

Read More »

नक्षलग्रस्त भागात केला जातोय सावध प्रचार

गडचिरोली ः वृत्तसंस्था गाडीवर लाऊड स्पीकर लावून, पक्षाचे झेंडे लावून प्रचार करण्याची पद्धत आपण नेहमीच पाहतो, पण गडचिरोलीतील दुर्गम भागातील खेड्यांमध्ये अत्यंत सावधपणे प्रचार केला जातो. पक्षाचे झेंडे घेऊन कोणी फिरत नाही, ना गाडीवर लाऊड स्पीकर लावून घोषणा दिल्या जातात आणि याचे एकमेव कारण म्हणजे नक्षल्यांची भीती. एकीकडे नक्षलवाद्यांची भीती, …

Read More »

उपद्रवी मंडळींना थेट कोठडीत डांबू; लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा इशारा

नागपूर ः प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याच किमतीत खपवून घेतला जाणार नाही. असा प्रकार करणारा व्यक्ती कितीही मोठा आणि कुणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. अशा उपद्रवी मंडळींना थेट कोठडीत डांबू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे. 11 एप्रिलला देशाचे …

Read More »

दोन वाहनांच्या धडकेत एक ठार दोन जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावरील दासगाव गावाजवळ रविवारी (दि. 7) रात्री सव्वा अकराच्या सुमारास एका ट्रकने टेम्पोला समोरुन ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालक ठार झाला तर दोन प्रवाशी जखमी झाले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दासगाव गावाजवळ रविवारी रात्री मुंबईकडे जाणार्‍या ट्रक  …

Read More »

मतदान केंद्रावर आता अत्यावश्यक सेवा उपलब्ध

अलिबाग : जिमाका हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय करण्यात आली आहे, तसेच तेथे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकादेखील नियुक्त करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 108 रुग्णवाहिकादेखील सहज उपलब्ध होतील, अशी माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. …

Read More »

नेरळ पूर्व भागातील नाला बिल्डर घशात घालतोय; पावसाळ्यात पाणी घरात घुसणार

कर्जत : बातमीदार नेरळ पूर्व भागातील नैसर्गिक नाल्यात अक्षर बिल्डरकडून मातीचा भराव केला जात असून, त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचून राहणार आहे. त्या नैसर्गिक नाल्यावर असलेली मोरी (साकव) अधिक रुंद करावी अशी मागणी असताना, अक्षर बिल्डरकडून नाल्यामध्ये मातीचा डोंगर उभा करण्यात आला आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतदेखील याकडे दुर्लक्ष करीत …

Read More »

धोत्रेवाडीमधील आदिवासींचे पाणी फार्महाऊस मालकाला

कर्जत : बातमीदार तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरींपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खाजगी जमीन मालकाने आपल्या फार्महाऊसमध्ये कुंपण बंद केली आहे. दरम्यान, शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाऊस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत, मात्र त्या वेळी बाजूच्या …

Read More »