Breaking News

Ramprahar News Team

उरण महाविद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम

उरण : रामप्रहर वृत्त  कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये  कवी कुसूमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दिन’  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द कवी  जितेंद्र लाड व  लक्ष्मण माने उपस्थित होते. प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “बहु असोत सुंदर” हे गीत सादर केले. मराठी भाषेचा इतिहास व कवितेचे वाचन  संजय पन्ना, …

Read More »

नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या पुढाकाराने कुष्ठरोग्यांसाठी शौचालय

पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग 17 मधील मालधक्का झोपडपट्टीतील कुष्ठरोग्यांसाठी शौचालयाची उभारणी मनपाच्या वततीने करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष या झोपडपट्टीत अनेक कुष्ठरोग्यांची कुटुंबे वास्तव्य करून आहेत. त्यांना शौचालयासाठी गटारातून उघड्यावर जावे लागत होते. अ‍ॅड. वाघमारे यांनी त्याची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

बँकेच्या नावाने फसवणूक दीड लाखांची रोकड लंपास

पनवेल : बातमीदार  एस.बी.आय.बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबीट कार्डची माहिती घेवून त्याद्वारे नवीन पनवेल येथील एका 80 वर्षीय इसमाच्या माझे बँक खात्यातील दीड लाख रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाबमी सिथारामय्या व्यंकटरामय्या परूचुरी (वय-80वर्षे, सेवानिवृत्त) यांच्या एस.बी.आय बँक शाखा पनवेल …

Read More »

खोपोलीत भाजपचा आनंदोत्सव

खोपोली : भारतीय हवाई दलाच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल खोपोलीत भाजपने आनंदोत्सव साजरा केला. शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, शहर सरचिटणीस, हेमंत नांदे, महिला अध्यक्षा रसिका शेट्ये, रमेश मोगरे, युवामोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, राहुल जाधव, प्रिन्सी कोहली, ज्येष्ठ नेते दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, …

Read More »

पाकिस्तान मुर्दाबादच्या नार्याने म्हसळा शहर दुमदुमले

म्हसळा : प्रतिनिधी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकीस्तानव्याप्त बालकोट भागात केलेल्या कारवाईबाबत म्हसळ्यातील नागरिकांनी  आनंद व्यक्त केला. शहरांतील सोशल मिडिया मार्फत आनंद व्यक्त होत असतानाच असल कादरी, सुवेल हवलदार, नईम दळवी, खालीद काजी, सुबान हळदे, अकमल कादरी या युवकांनी नेतृत्व करीत म्हसळा शहरातून भारतीय हवाई दलाचा जयजयकार केला. यावेळी …

Read More »

हवाई दलाच्या कारवाईचे रायगडात स्वागत; अलिबागेत रॅली काढून जल्लोष…

अलिबाग : प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय वायुसेनेने बदला घेतला. पाक व्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईचे अलिबागमध्ये जल्लोष करून स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधान सभा मतदार संघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अलिबागेत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये समाजातील विविध स्तरातील …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा संघटन संवाद, कर्जतमध्ये असंख्य कार्यकर्ते जमले एकत्र

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारचा नारा दिला. मोदी यांचे लाईव्ह भाषण कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 28) शिरसे येथील राधामाई मंगल कार्यालयात ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘संघटन संवाद‘ च्या माध्यमातून पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे -डॉ. अविनाश पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश पाटील यांनी केले आहे. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 27) मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

पी. जे. पाटील म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रशंसोद्गार, अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

उरण : वार्ताहर पी. जे. पाटील म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रशंसोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. जसखार गावचे  सुपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते व शिक्षणप्रेमी पी. जे. पाटील यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी (दि. 26) श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान जसखार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी …

Read More »

ऑनलाइन दिसणार आरक्षण यादी रेल्वेची नवी सेवा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विमान प्रवासाप्रमाणे आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार सीट निवडता यावं यासाठी ‘ऑनलाइन चार्ट’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच उपलब्ध असलेल्या आसनांबाबत अर्थात आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल. रेल्वेच्या या नव्या सेवेद्वारे प्रवाशांना गाडीच्या डब्याची सचित्र माहिती (ग्राफिकल प्रेझेंटेशन) तसेच …

Read More »