दौंड ः प्रतिनिधी मलठण येथे अफूची शेती करणार्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या शेतातून अंदाजे साडेसात लाख रुपयांची अफूची रोपे ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. या प्रकरणी संतोष अण्णा ढवळे (48) आणि विकास झुंबर ढवळे (27, दोघेही रा. हिंगणीबिर्डी, ता. दौंड) यांना …
Read More »इराणची पाकमध्ये घुसून कारवाई करण्याची धमकी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर आता इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. भारताप्रमाणे इराणही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी त्रस्त आहे. पाकिस्तानातून इराणविरोधी दहशतवादी कारवाया चालतात. पाकिस्तान या दहशतवादी गटांना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्यामुळे इराणच्या सरकारने आणि सशस्त्र दलांनी …
Read More »‘अभिनंदन यांचे पुन्हा कॉकपीटमध्ये जाणे फिटनेसवर अवलंबून’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे फायटर वैमानिक म्हणून पुन्हा रुजू होणे त्यांच्या वैद्यकीय फिटनेसवर अवलंबून आहे, असे हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी सोमवारी सांगितले. विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारीच पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका झाली. भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 फायटर जेट विमानांना पिटाळून लावताना …
Read More »आधुनिक एके-203 रायफलींची अमेठीत होणार निर्मिती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येणार आहे. अमेठीत बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात रशियाच्या सहकार्याने एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केली. पंतप्रधान मोदींचे प्रयत्न आणि रशियाच्या सहकार्यामुळे अमेठीत …
Read More »पेणनजीक धरमतर येथे चीनचा नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चीनमधील नाइन ड्रॅगन्स पेपर्स या कंपनीमध्ये शनिवारी करार झाला. त्यानुसार रायगडमधील धरमतर येथे नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प उभारणार असून, येत्या पाच वर्षांत साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, तसेच या कालावधीत 10 हजार कोकणवासीयांसाठी नोकर्या उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास …
Read More »‘जैश’चा म्होरक्या मसूदचा मृत्यू?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे हात असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-महम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, मात्र या वृत्ताला अद्याप पाकिस्तानकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार 2 मार्च रोजी मसूदचा मृत्यू झाला आहे, मात्र टाइम्स नाऊच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीनंतर मसूदच्या मृत्यूची अधिकृत …
Read More »कशेडी घाटात रसायनाचा टँकर पेटला
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. या वेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली, मात्र तरीही टँकर धुमसत असल्याने महाड नगर परिषद आणि खेड नगर परिषदेच्या दोन …
Read More »पनवेलमध्ये भाजपची विजयी संकल्प बाईक रॅली; आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व; युवाशक्तीचा एल्गार
पनवेल : प्रतिनिधी भारतमाता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, अब की बार फिर मोदी सरकार… अशा घोषणांनी रविवारी (दि.3) सकाळी पनवेल शहर आणि तालुक्याचा परिसर दणाणून गेला. निमित्त होते पनवेल शहर आणि तालुका भाजपतर्फे काढण्यात आलेल्या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे. जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »पाकसमवेत खेळण्यासाठी दबाव
मुंबई ः प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये खेळू नये, अशी देशवासीयांची भावना होती. त्यानंतर बीसीसीआयनेदेखील आम्ही पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आयसीसीला कळवले होते, पण आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय …
Read More »फेडरर नाबाद 100
दुबई : वृत्तसंस्था महान टेनिसपटू रॉजर फेडररने दुबईतील एटीपी टेनिस स्पर्धेत स्टेफॅनो सितसिपासला 6-4, 6-4 असे पराभूत करत आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील 100वे एटीपी विजेतेपद पटकावले. 20 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणार्या 37 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सनंतर 100 विजेतीपदे जिंकणारा टेनिसपटू म्हणून आपला ठसा उमटवला आहे. कॉनर्सच्या खात्यात 109 विजेतीपदे आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper