अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर राज्यातील समुद्रकिनार्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. त्याकरिता कोकणातील सात जिल्ह्यांसाठी सात यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यापैकी एक यंत्र रायगड जिल्ह्यासाठी दाखल झाले असून पुढील काही दिवस ते अलिबाग समुद्र किनार्याची स्वच्छता करणार आहे. समुद्रकिनार्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने पुढाकार घेतला आहे. समुद्रकिनार्यांची …
Read More »माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी
कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये बुधवारी (दि. 27) ई-रिक्षाची चाचणी घेण्यात आली. या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, चाचणीसंदर्भातील अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ई-रिक्षाच्या चाचणीवेळी राज्य प्रादेशिक परिवहन उपअधिकारी चंद्रकांत माने, पनवेल विभागीय प्रादेशिक …
Read More »बचत गटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहचवा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे साहिल महिला बचत गटाचे रास्त भाव धान्य दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी त्यांनी महिलांपर्यंत विविध लाभदायक योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्याध्यापक सुरेश पाटील यांना सेवानिरोप पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश काशिनाथ पाटील 35 वर्षे प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) …
Read More »किक बॉक्सिंग स्पर्धेत श्रावणी म्हात्रेला रौप्यपदक
पेण ः रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील जिते येथील श्रावणी दिलीप म्हात्रे हिने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिचे जितेसह पेण तालुक्यात कौतुक होत आहे. श्रावणी म्हात्रे ही केईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. रौप्यपदक पटकाविल्याबद्दल श्रावणीचे अभिनंदन होत आहे. हैदराबाद …
Read More »नवी मुंबईत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेस प्रारंभ
नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा पारिषदेच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडागंणातील फुटबॉल मैदानात 25 ते 29 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील …
Read More »चौलच्या रामेश्वर पुष्करणीत पाणकावळ्यांची सैर
रेवदंडा ः प्रतिनिधी पावसाळ्यात तुडूंब भरलेल्या चौल येथील रामेश्वर पुष्करणीत दुर्मीळ पाणकावळ्यांचे आगमन झाले आहे. त्यांचे पोहणे, मासेमारीसाठी पाण्यात खोलवर डुबकी मारणे आनंददायी चित्र आहे. चौल रामेश्वर पुष्करणीत गेले काही दिवस तीन पाणकावळे सैर करताना दिसून येत आहेत. चकचकीत काळसर वर्णाचा, काळ्या पिसावर हिरवट निळसर झाक, निमुळती, चपटी व टोकाशी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय साहित्याचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि राज्य शासनाच्या इसीआरपी अंतर्गत पनवेल येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला विविध वैद्यकीय मेडिकल साहित्य देण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) झाले. या वेळी आमदार …
Read More »राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पेणच्या वंशला ‘रौप्य’
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारपाडा येथील वंश संजय घरत याने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. यासोबतच त्याने खारपाड्यासह पेण तालुक्याचे नाव उंचावले आहे. वंश घरत हा रायगड जिल्हा परिषदेच्या खारपाडा येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक रवींद्र म्हात्रे …
Read More »राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला 13 पदके
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबईच्या प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनात झालेल्या राज्य सब ज्युनियर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर या पुरुष आणि महिला गटाच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी 13 पदके जिंकली. ही स्पर्धा महाक्रीडा प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगडच्या कुणाल पिंगळे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper