Breaking News

Ramprahar News Team

कर्जत स्थानकात आणखी एक रेल्वेमार्ग, जुना पादचारी पूल होणार निकामी

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात नवीन लोहमार्ग टाकण्यात येत आहे. त्यासाठी भिसेगाव-गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल निकामी करण्यात येणार आहे. दरम्यान, नवीन रेल्वेमार्गामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून नवीन पादचारी पूल उभारला जात असून त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुण्याकडे जाणार्‍या सर्व गाड्या अतिरिक्त इंजिन …

Read More »

रोह्यातील रस्त्याची दूरवस्था; किमान खड्डे भरण्याची नागरिकांची मागणी

रोहे : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील सागर डेअरी ते एक्सल कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत आहेत. त्याचा प्रवासी व वाहनचालकांना त्रास होत असून रोहा नगर परिषदेने किमान खड्डे तरी भरावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रोहा नगर परिषद हद्दीतील सागर …

Read More »

वरंध घाटामध्ये दरड कोसळून एक जखमी

महाड : प्रतिनिधी महाड-भोर मार्गावरील वरंध घाटामध्ये वाघजाई मंदिराजवळ बुधवारी (दि. 29) सकाळी दरड कोसळली. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. ही दरड लहान स्वरूपात असल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. वरंध घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने धोकादायक ठरत आहे. या घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा घाट बंदही …

Read More »

घरातून निघून गेलेल्या मुलीचा चार तासात शोध

माणगाव पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन माणगाव : प्रतिनिधी घरातून निघून गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चार तासांच्या आत शोध घेऊन माणगाव पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. माणगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे राहणार्‍या  मंगला संदिप वाघमारे (वय 28) यांनी त्यांची मुलगी तेजश्री संदिप वाघमारे (वय 13) ही सोमवारी (दि. 27) दुपारी …

Read More »

कर्जतचे चित्रकार सुनील परदेशींना ’सिग्नेचर मेंबर’ चा बहुमान

कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथील चित्रकार सुनील परदेशी यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला-संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे ते भारतातील दुसरे चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी यांनी 1972मध्ये केली. ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुनी …

Read More »

आज ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन अलिबाग : जिमाका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने रायगड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील कुशल व अकुशल उमेदवारांसाठी गुरुवारी (दि. 30) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजन करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या कौशल्य …

Read More »

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉपआऊट

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून 5 ते 20 जुलै या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट राबवले जाणार आहे. या अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …

Read More »

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हताश

पोलादपुरात ऊन-पावसाचा खेळ कायम पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस एक-दोन दिवसाआड हजेरी लावत आहे. ऊन- पावसाच्या या खेळात भाताच्या रोपांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने काही भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या 10-15 दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात पावसाची …

Read More »

विकासकामांसंदर्भात पनवेल महापालिकेत आढावा बैठक

पनवेल : प्रतिनिधी पनवेल मनपा कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक मंगळवारी (दि. 28) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करणे, अहिल्याबाई होळकर भवन आणि माता-बाल संगोपन केंद्राचे संकल्प चित्राचा प्रस्ताव तयार करणे, रोज बाजारांच्या निविदा …

Read More »

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडला

लिओ कोलासो यांचा आरोप; मच्छीमार संघर्ष यात्रेचे मुरूडमध्ये जोरदार स्वागत मुरूड : प्रतिनिधी कोकण किनारपट्टीचे डिझेल परताव्याचे सुमारे 450 कोटी रुपये थकीत आहेत. राज्य सरकारच्या अशा नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मंगळवारी (दि. 28) मुरूड येथील जाहीर सभेत केला.मच्छीमारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी …

Read More »