पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच, आजी-माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा व भाजप कार्यकर्ता मेळावा बुधवारी (दि. 1 जून) सायंकाळी 6 वाजता नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदगाव …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा बुधवारी गौरव समारंभ
पनवेल : प्रतिनिधी सर्वसामान्यांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने बुधवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ०४ वाजता खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ईश्वर शक्तीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात समाजप्रबोधन करीत असलेल्या ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा गौरव समारंभ होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे …
Read More »भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल; राज्यसभा निवडणूक
…तर घोडेबाजार होणार नाही -देवेंद्र फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील तिन्ही उमेदवारांचे अर्ज सोमवारी (दि. 30) दाखल केले. या वेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो म्हटल्यानंतर त्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केले …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
न्हावाखाडी येथे अभीष्टचिंतन सोहळा, ज्येष्ठ नागरिक सत्कार, ‘मी मराठी’ संस्कृती दर्शन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या गुरुवारी (दि. 2 जून) 71वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यासाठी …
Read More »पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी विविध लाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली महत्त्वपूर्ण घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 30) पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठविण्यात येणार आहे. …
Read More »कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुमुक्षा घरतला ‘सुवर्ण’
मुरूड ः प्रतिनिधी नेपाळ काठमांडूमधील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पहिली इंडो नेपाळ इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप नुकतीच झाली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चौल बागमळा येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मुमुक्षा आनंद घरत हिने काता विभागात सुवर्ण आणि कुमिते विभागात रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारतातून व नेपाळमधून सुमारे 50 स्पर्धक सहभागी झाले होते. …
Read More »कोंडाळकर्स क्रिकेट अॅकेडमीचे उद्घाटन
मोहोपाडा ः प्रतिनिधी रिलायन्स इंडस्ट्रिजचे माजी कर्णधार, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर राजेंद्र कोंडाळकर यांनी लोधिवली रिलायन्स टाऊनशीप येथे क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. रिलायन्स पाताळगंगा पेट्रोकेमिकल्सचे प्रेसिडेंट आशु गर्ग, एचआर हेड थॉमस इसो यांच्या हस्ते कोंडाळकर क्रिकेट अकादमीचे उदघाटन करण्यात आले. या समारंभाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत …
Read More »पनवेल ः सामाजिक बांधिलकीचा संदेश देत संत निरंकारी मिशनद्वारे कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी त्यांच्यासह कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी उपस्थित होते.
Read More »दीपाली सय्यदविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दीपाली सय्यद टीका करतात. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजप पदाधिकारी दिव्या ढोले …
Read More »सायक्लोथॉनसंदर्भात जनजागृती रॅली
पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 5 जून) उलवे नोडमध्ये भव्य सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सायक्लोथॉनचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper