पाली ः प्रतिनिधी पाली व उन्हेरे फाट्यावर चार ठिकाणी चोर्या झाल्या आहेत. चोरट्यांनी घर, बियर शॉपी व गोडाऊन फोडून ऐवजाची चोरी केली तसेच दुचाकीही पळवून नेली आहे. याबाबत पाली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आता चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या संदर्भात पाली पोलीस …
Read More »पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेत यशवंतखार संघ विजेता
रोहे प्रतिनिधी रोहा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी विभाग आयोजित कबड्डी स्पर्धेत यशवंतखार संघाने विजेतेपद पटकाविले, तर स्वयंभू भातसई संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत तृतीय क्रमांक गावदेवी भातसई आणि चतुर्थ क्रमांक मालसई या संघाने मिळविला. वैयक्तिक पारितोषिके सामनावीर म्हणून विराज गुंड (यशवंतखार), उत्कृष्ट पकड तुतेश खरिवले (भातसई), उत्कृष्ट चढाई सुयोग आयरे …
Read More »सुभाष पुजारी दुसर्यांदा मास्टर महाराष्ट्र श्री
पनवेल ः वार्ताहर महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी नुकत्याच झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मास्टर महाराष्ट्र श्री हा बहुमान दुसर्यांदा पटकावून या प्रकारात आपला दबदबा किती आहे हे दाखवून दिले तसेच त्यांची पाँडिचेरी येथे देश पातळीवरील होणार्या मास्टर भारत श्री स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. पाँडिचेरी येथे …
Read More »भ्रष्टाचाराची माळ
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संशयाच्या घेर्यामध्ये अडकले आहेत. भ्रष्ट कारभाराच्या या माळेतील ताजे रत्न म्हणून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घ्यावे लागेल. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीची लपवाछपवी केल्यासंबंधीच्या एका जुन्या खटल्यामध्ये न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पंचवीस हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला …
Read More »कर्जत चांदईतील शेतकरी माधव कोळंबे यांची मिश्र शेती
कर्जत : बातमीदार तालुक्यातील चांदई गावातील शेतकरी माधव कोळंबे हे राजकारणाबरोबरच शेतीत करतात. आनंद मिळतो म्हणून शेती करणारे माधव कोळंबे यांच्याकडे शेतात काम करायला बाहेरून मजूर आणले जात नाहीत. शेतात पिकवलेल्या भुईमूगापासून शेंगदाणा तेल बनविणारे कोळंबे फावल्या वेळेत राजकारणही करतात. आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकतरी सदस्य झेडपीमध्ये गेलाच पाहिजे असा …
Read More »रायगडात ‘लालपरी’च्या उत्पन्नात वाढ
राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागात 40 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे या विभागातील आठ आगारांतून एसटीच्या दिवसाला सरासरी 450 फेर्या होत आहेत. प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे मागील महिन्यात रायगड विभागात एसटीचे दिवसाला सात लाख रुपये असणारे उत्पन्न या महिन्यापासून दिवसाला तब्बल 10 लाखांवर गेले आहे. लालपरी ही …
Read More »सुधागडातील उन्हेरे बुद्रुक येथे घराला आग; दोन लाखांहून अधिक मुद्देमाल, रोख रक्कम जळून खाक
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उन्हेरे बुद्रुक (धनगरवाडी) येथील राम धोंडू ढेबे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग नक्की कशाने लागली याचे कारण समजलेले नाही. मात्र आग शॉर्टसर्किटमुळे लागली …
Read More »शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन
मुरूड : प्रतिनिधी अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रविण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 11) काम बंद आंदोलन केले आहे. मुरूड नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, बांधकाम विभाग अधिकारी संजय वेटकोळी, पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत दिवेकर, नरेंद्र नांदगावकर, साहिल मुजावर, कपिल वेहेले, गोपाळ चव्हाण, राकेश पाटील, …
Read More »फणसाड अभयारण्य पर्यटकांना खुले; रानगव्यांची संख्या वाढली
मुरूड : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने फणसाड अभयारण्य 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हे अभयारण्य आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मुरूडपासून 14 कि.मी. अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ 54चौ.कि.मी.आहे. याअभयारण्यात विविध वन्यजीव, अनेक सरपटणारे प्राणी व औषधी वृक्षांची संपदा आहे. बिबट्या, रानमांजर, …
Read More »माथेरानमधील आकाशगंगा निरीक्षण केंद्र बंद
कर्जत : बातमीदार माथेरान नगर परिषदेने आकाशगंगा हा अवकाश निरीक्षण प्रकल्प उभारला आहे. काही खगोलप्रेमी या केंद्रावर येऊन अवकाश दर्शन करायचे. मात्र कोटीच्या घरात खर्च करून उभारलेला हा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. आकाशगंगा निरीक्षण केंद्रात आल्यानंतर पर्यटकांना सुरुवातीला ग्रह आणि तार्यांविषयी माहिती दिली जाते. त्यानंतर 35 आसनी थिएटरमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper