पनवेल : रामप्रहर वृत्त न्यू इयर सेलिब्रेशनचे तरुणाईसह सर्वांनाच वेध लागले आहेत, परंतु कोरोनाचा नवा व्हेरिएंट असणार्या ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून नवी नियमावलीनुसार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महसूल प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमांचे उल्लंघन करणार्या …
Read More »एमपीएसची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली
मुंबई ः प्रतिनिधी येत्या 2 जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार याची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांचे नियोजन पुन्हा एकदा बिघडले आहे. …
Read More »महिला सरपंचाच्या खुनाचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा मृतदेह सोमवारी दुपारी संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली आहे. या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे सोमवारी सकाळी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोनच्या …
Read More »विदर्भ, मराठवाड्यासह प. महाराष्ट्रात गारपीट; बळीराजा चिंतेत
अकोला, नगर ः प्रतिनिधी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर गारपिटीसह वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकर्यांची चिंता वाढली आहे. विदर्भातील अकोल्यात मंगळवारी (दि. 28) दुपारी 2च्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अकोल्यासह भंडारा, …
Read More »विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील अधिवेशनात!
मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. ही निवडणूक कधी होणार? कशी होणार? राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार? अशा अनेक मुद्द्यांवरून तर्क-वितर्क सुरू होते, मात्र अखेर याबाबतचा निर्णय झाला असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार असल्याचे …
Read More »सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे व नव्याने विकसित होणार्या गृहप्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात योग्य ती उपाययोजना करा, अशी मागणीही …
Read More »जनजागृती ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश माळी
अलिबाग : अलिबाग रायगड जिल्हा जनजागृती ग्राहक मंच या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा सचिवपदी खोपोलीचे नितीन पाटील आणि खजिनदारपदी अलिबागचे विशाल राऊळ यांची निवड झाली. संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी (दि. 26) पेण येथील गांधी वाचनालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर मेहर …
Read More »मुरूडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जागर
मुरूड : प्रतिनिधी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या मुरूडजवळील ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर रविवारी (दि. 26) दोनशे शिवप्रेमींच्या उपस्थित पद्मदुर्ग जागर उत्सव साजरा करण्यात आला. शिवप्रेमींनी रविवारी सकाळी मुरूड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली होती. त्यानंतर बोटीतून ही पालखी पद्मदुर्ग किल्ल्यावर आणण्यात आली. किल्ल्यात प्रथम अर्पिता ठाकूर …
Read More »कर्जत तहसील कार्यालयाचा पायरी मार्ग हरवला गवतात
कर्जत : बातमीदार टेकडीवरील कर्जत तहसील कार्यालयात जाण्यासाठी असलेली पायवाट गवतात हरवली आहे. सामान्य लोकांची वाट म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कधी गवतमुक्त करणार याकडे सार्यांचेच डोळे लागले आहेत. कर्जत तालुक्याचे मुख्यालय असलेले तहसील कार्यालय हे रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या टेकडीवर आहे. तेथे नागरिकांची सतत वर्दळ असते. …
Read More »अमेय म्हात्रेने बोरी ते कर्नाळा अंतर दोन तास 25 मिनिटांत केले पार
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बोरी गावचा सुपुत्र अमेय चंद्रकांत म्हात्रे याने बोरी ते कर्नाळा हे 26 किलोमीटर अंतर दोन तास 25 मिनिटांत धावून पार केले. या उपक्रमात अमेय याला संगम म्हात्रे, प्रणीत मोकल, जितू म्हात्रे, विकी म्हात्रे आदींची साथ लाभली. अमेय म्हात्रे गेल्या काही वर्षांपासून धावण्याचा नियमित सराव करत आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper