कोलकाता ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील 3-0 अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ट्वेन्टी-20 सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत कर्णधार रोहितने त्याची प्रशंसा केली. ईडन गार्डन्सवर भारताने …
Read More »‘यलो ब्रिगेड’ जोमात; तामिळनाडूच्या विजयानंतर अनोखी हॅट्ट्रिक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था येथील स्टेडियमवर रंगलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने विक्रमी विजेतेपद मिळवले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 धावांची आवश्यकता असताना प्रतिक जैनच्या चेंडूवर शाहरुख खानने उत्तुंग षटकार लगावत संघासाठी विजयश्री खेचून आणली. तामिळनाडूच्या विजयामुळे एक अजब असा योगायोग पाहायला मिळाला. क्रिकेटच्या क्षेत्रात यंदा काही मोजक्या मोठ्या …
Read More »बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा
पनवेल ः वार्ताहर बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी 7.30 वा. खांदा कॉलनीतील महात्मा स्कूल मैदानात करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ 12 ते 15 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे होत असलेल्या 18 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे …
Read More »टीम इंडियाला मोठा धक्का; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून राहुल ‘आऊट’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज लोकेश राहुल हा दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला. त्याच्या जागी मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसी आय) ट्विट करून दिली. भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्धची …
Read More »नवी मुंबई विमानतळावरून 2024मध्ये होणार पहिले उड्डाण
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेल्या अनेक वर्षांपासून डेडलाइनवर डेडलाइन देणार्या सिडकोने आता पुन्हा अंतिम तारीख जाहीर केली असून तीन वर्षांनंतर म्हणजेच 2024मध्ये येथून विमान हवेत झेपावताना पहायला मिळणार आहे. सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी विमानतळाचे डिझाइन असलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करीत त्यांनी 2024 …
Read More »तळोजा सिलिंडरच्या स्फोटाने कामगार वस्तीला भीषण आग; दोन जण जखमी
कळंबोली : प्रतिनिधी तळोजा सेक्टर 28 परिसरात बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के समूहाकडे काम करणार्या कामगारांच्या वस्तीला सोमवारी (दि. 22) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन जण जखमी झाले असून संपूर्ण वस्ती जळून खाक झाली आहे. तळोजातील पेंधर येथील सेक्टर 28 परिसरात सध्या सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत …
Read More »दिवेआगरच्या मंदिरात गणपतीच्या सुवर्ण मुखवट्याची आज प्रतिष्ठापना
अलिबाग : प्रतिनिधी दिवेआगर येथील मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 23) केली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील मंदिरातून 23 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून सुवर्णगणेशाचा मुखवटा व दागिने मिळून एक किलो 600 ग्रॅम सोने पळवून …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अरुणशेठ भगत यांचे वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 22) विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हितचिंतकांनी अभिष्टचिंतन केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अरुणशेठ भगत गेल्या 50वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. लोकनेते माजी खासदार …
Read More »महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त; आमदार किसन कथोरे यांचा आरोप
अलिबाग ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट व नाकर्त्या कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे कमी म्हणून की काय अतिवृष्टीबाधित आणि वादळग्रस्तांना अत्यल्प मदत देऊन राज्य सरकारने शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप भाजप नेते आमदार किसन कथोरे यांनी केला. ते सोमवारी (दि. 22) अलिबागमध्ये आयोजित भाजपच्या पत्रकार परिषदेत …
Read More »विधान परिषद निवडणूक : चंद्रशेखर बावनकुळेंचा अर्ज दाखल; भाजपचे शक्तिप्रदर्शन
नागपूर ः प्रतिनिधी नागपूरमधून विधान परिषदेसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यानिमित्ताने भाजपने सोमवारी (दि. 22) नागपुरात शक्तिप्रदर्शन केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला अतिशय आनंद आहे की, आमचे सहकारी चंद्रशेखर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper