Breaking News

Ramprahar News Team

सर्वांना भाजपचे आकर्षण; उलवे नोडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची क्रेझ आजही कायम असून उलवे नोडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 30) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप बिहार प्रकोष्ठ …

Read More »

सामूहिक आत्महत्येने नवी मुंबई हादरली; आईसह मुलगा, मुलीचा मृत्यू

नवी मुंबई : दिवाळीपूर्वी नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशीतील एकाच कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलगी अशा तिघांनी सामूहिक आत्महत्या केली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 85 वर्षीय मोहिनी कामवानी, मुलगा दिलीप कामवानी (67) आणि मुलगी कांता कामवानी (61) यांनी तीन दिवसांपूर्वी विष …

Read More »

इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर एकतर्फी मात; बटलरची फटकेबाजी

दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीत विश्वविजेत्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला आठ गडी राखून मात देत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडने जबरदस्त मारा करीत ऑस्ट्रेलियाला 125 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलरने 32 चेंडूंत नाबाद 71 धावा …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते साईनगर ते पनवेल बससेवेचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करणारी एनएमएमटी बस क्रमांक 75ची सेवा भाजप युवा मोर्चाने केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुरवठ्यामुळे पुर्ववत झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाला. ही बस सेवा …

Read More »

भाजप कामगार सेल कोकण विभागाची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कामगार सेलच्या कोकण विभागाची बैठक गुरुवारी (दि. 28) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या बैठकीला कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष गणेशभाऊ ताटे, प्रदेश सरचिटणीस तसेच पिंपरी …

Read More »

वडखळ-शिर्की रस्त्यासाठी नितीन गडकरींचा हिरवा कंदील; आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पेण : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वडखळ-शिर्की रस्त्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांच्याबरोबरच केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हिरवा कंदील दाखविल्याने या रस्त्याच्या अंतिम मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याबरोबरच वाशी नाका ते डोलवी या सर्व्हीस रस्त्याच्या दुरुस्तीसाठीदेखील नितीन गडकरी यांनी …

Read More »

पनवेल मनपा मुख्यालयात दक्षता जनजागृती सप्ताह

पनवेल : प्रतिनिधी भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यभरात 26 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय दक्षता आयोग, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेत या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत उपायुक्त विठ्ठल डाके यांनी पनवेल महापालिका मुख्यालयातील अधिकार्‍यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ …

Read More »

पनवेल शहरात होणार जलशुद्धीकरण केंद्र; स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जुने पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र, उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या अतिरिक्त बाबींच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. आहे. त्यामुळे पनवेलकरांना शुध्द पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. 29) स्थायी …

Read More »

उरण नगर परिषदेतर्फे जनजागृतीपर सायकल रॅली

उरण : वार्ताहर माझी वसुंधरांतर्गत पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार उरण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये सायकल रॅलीद्वारे जनजागृती करून अभियान राबविण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले. सकाळी 10 …

Read More »

उरण नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाचे वाटप

उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषद कर्मचार्‍यांना भरीव असे सानुग्रह अनुदान रक्कम 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. याबद्दल उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी सर्व गटनेते आणि नगरसेवक, नगरसेविका यांचे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी …

Read More »