Breaking News

Ramprahar News Team

भारताचा आज अफगाणिस्तानशी होणार सामना; सुपर-12 लढत

आबुधाबी ः वृत्तसंस्था सलग दोन पराभव पत्करलेल्या भारतीय संघाचा टी-20 विश्वचषकातील सुपर-12मधील पुढील सामना बुधवारी(दि. 3) अफगाणिस्तानविरुद्ध आहे. त्यामुळे भारत हा सामना जिंकून विजयाचे खाते खोलण्यास उत्सुक असेल. वर्ल्डकपमध्ये भारताचा समावेश दुसर्‍या गटात आहे. या गटातून पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असून पाचव्या स्थानावरील भारताची निव्वळ धावगती फारच खालावलेली आहे. …

Read More »

राजकारणातले फुसके बार

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द कार्यक्षमता आणि पारदर्शकता या दोन गोष्टींसाठी लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. फडणवीस यांच्यावर थिल्लर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मलिक यांनी तेच करत आपली पातळी दाखवली. राजकारणामध्ये परस्परांवर आरोप होऊ शकतात, होत असतात, परंतु कुणाच्या पत्नीस किंवा कुटुंबीयांस त्यात ओढण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आणि हीन …

Read More »

भुतिवलीवाडीत किराणा सामान वाटप

कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनने कर्जत तालुक्यातील भुतीवलीवाडीमधील आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणार्‍या किराणा सामनाचे वाटप केले. या वाडीमधील 12 आदिवासी लोकांच्या घरात या वर्षी पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांच्या घरातील धान्य खराब झाले होते. येथील आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी फाउंडेशनकडून ही मदत …

Read More »

कर्जतमध्ये घरफोड्या करणार्‍याला अटक

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील मुद्रे येथील रेव्हेन्यू कॉलनीमधील घरफोडी प्रकरणी कर्जत पोलिसांनी आरोपींना मुद्देमलासह ताब्यात घेतले. कर्जत मुद्रे येथील रेव्हेन्यु कॉलनीमध्ये, राहणारे रंजित धोंडीबा चव्हाण आणि त्यांचे कुटुंब घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने 13 ऑक्टोबर रोजी घरफोडी करून त्यांच्या फ्लॅटमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व मोबाइल असा एकूण …

Read More »

आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करा; पेण तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी

पेण : प्रतिनिधी तालुक्यात खरीप हंगामातील भाताची कापणी करण्यास सुरुवात झाली असून, पेण तालुक्यात अद्याप आधारभूत खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. बाजारात भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पेण तालुक्यातील शेतकरी करीत आहे. रायगड …

Read More »

आदिवासींची पाण्यासाठी पायपीट; कर्जतमधील मोरेवाडी, ताडवाडी ग्रामस्थांची परवड

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवाडी आणि ताडवाडी येथील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पावसाळा संपताच लगेचच येथील महिलांना पाण्यासाठी मातीच्या बंधार्‍यावर जावे लागत आहे. त्यासाठी या आदिवासी महिलांना पुरुषांची मदत घ्यावी लागत असल्याने पाण्यासाठी येथील आदिवासी लोकांचा रोजगारदेखील बुडत आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका …

Read More »

कर्जत डामसेवाडीतील आदिवासींना दिवाळी भेट

कर्जत : बातमीदार पनवेल कामोठे येथील निर्धार सामाजिक संस्थे तर्फे कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील डामसेवाडी येथील आदिवासी कुटुंबाना दिवाळी फराळासह कपडे, शैक्षणिक साहित्य, धान्य तसेच आकाश कंदिलचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी अनिल कुंभार, शुभम वाळके, कमलेश पाटील, रोहीत पाटील, निलेश आहेर, सुरेश झोरे आदींनी डामसेवाडीत जावून तेथील आदिवासी …

Read More »

अमर वार्डे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

अलिबाग : प्रतिनिधी दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे यांच्या ’उनाडक्या’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. 30) सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त अशोक टिळक आणि मनीषा टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या सभागृहात अ‍ॅड. संजीव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रकाशक फारूक …

Read More »

‘गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना 108 रुग्णवाहिकेची माहिती असायलाच पाहिजे’

अलिबाग : रामप्रहर वृत्त अपघातस्थळी तातडीने पोचून जखमींना रुग्णालयापर्यंत पोचविण्याचे काम 108 ही रुग्णवाहिका करीत असल्याने या रुग्णवाहिकेबाबतची माहिती गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना असायला पाहिजे, असे मत आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा होमगार्ड व नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग गोंधळपाडा येथील होमगार्ड प्रशिक्षण …

Read More »

पेणमध्ये सायकल रॅली

पेण : प्रतिनिधी माझी वसुंधरा अभियानांतर्गत पेण नगर परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती. प्रदूषण रोखण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी सायकलचा वापर करा आणि शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी केले. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी नगर परिषद …

Read More »