Breaking News

Ramprahar News Team

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे; दसरा मेळाव्यातील टीकेचा फडणवीसांकडून समाचार

नागपूर ः प्रतिनिधी शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी मुंबईत झाला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. …

Read More »

अलिबागेत अल्पवयीन मुलीला देहविक्रीला लावण्याचा प्रयत्न; फार्महाऊस मालक, महिलांसह चौघांना अटक

अलिबाग : प्रतिनिधीघरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने देहविक्रीच्या नरकात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यात उघडकीस आला आहे, मात्र या मुलीने अत्यंत हुशारीने या नराधमांच्या तावडीतून पळ काढत मांडवा सागरी पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःची सुटका करून घेतली. या प्रकरणी दोन महिला व एका फार्महाऊस मालकासह चौघांना …

Read More »

चेन्नईचा जेतेपदाचा चौकार; आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोलकातावर मात

दुबई ः वृत्तसंस्था फॅफ ड्यू प्लेसिसच्या (86) उत्कृष्ट फलंदाजीनंतर शार्दूल ठाकूरने (3/38) केलेल्या भेदक मार्‍यामुळे चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला 27 धावांनी धूळ चारत इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या 14व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद ठरले.दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात …

Read More »

धोनीचा ‘त्रिशतकी’ विक्रम!; टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून खेळला 300 सामने

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कोलकाताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. ट्वेण्टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा हा 300वा सामना होता आणि ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. धोनीने चेन्नईचे 214 सामन्यांत नेतृत्व केले असून त्याने एका आयपीएल हंगामाच्या 14 सामन्यांत रायझिंग पुणे …

Read More »

पनवेलमधील सिनियर क्रिकेट टी क्लबच्या हंगामाची सुरुवात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्‍या विजयादशमी अर्थात दसर्‍याच्या दिवशी पनवेलमधील सिनियर क्रिकेट टी क्लबच्या खेळाडूंनी नूतन हंगामाची सुरुवात झाली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नंतर चौफेर फटकेबाजी करीत या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.  पनवेल परिसरातील विविध स्तरातील ज्येष्ठ व तरुण …

Read More »

गाता रहे मेरा दिल… किशोर कुमार यांना संगीतमय आदरांजली; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, तसेच रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कलासागर परिवारनिर्मित आयोजित स्वर्गीय किशोर कुमार यांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या ‘गाता रहे मेरा दिल’ या कार्यक्रमात बहारदार किशोर गीतांचा अनुभव श्रोत्यांना अवर्णनीय आनंद देऊन गेला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

आता लोकल प्रवास होणार अधिक सुलभ

मुंबई : प्रतिनिधी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासासाठी आता मासिक पासबरोबरच तिकीटही मिळणार आहेत, तसेच 18 वर्षांखालील सर्वांना कोणत्याही अटीविना प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकल सेवा शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा …

Read More »

रोह्यात आज विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन व जलशुद्धीकरण आरओ प्लांटचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार …

Read More »

सरसंघचालक मोहन भागवतांचा ड्रग्जसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्लाबोल

नागपूर : प्रतिनिधीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील ड्रग्जचे व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजवरून हल्लाबोल केला. नागपूरमधील विजयादशमीच्या भाषणात भागवत यांनी देशातील वाढत्या ड्रग्जच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली, तसेच राज्य सरकारला ड्रग्ज व्यसनांचे पूर्ण निर्मूलन करावे लागेल, असे मत व्यक्त केले. या वेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मितीवरही …

Read More »

कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला वेग -नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाच्या कठीण काळानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने वाढ होत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला आता आशा आहे. नुकतेच एका जागतिक संस्थेनेसुद्धा म्हटले की, भारत पुन्हा एकदा जगातील वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त  केला. पंतप्रधान …

Read More »