Breaking News

Ramprahar News Team

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोदी; सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली ः केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी जवळपास 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी (दि. 27) ही मदत जाहीर केली. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका राज्यातील शेतीलाही बसला. पुराचे …

Read More »

क्रिकेटपटू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह; भारत-श्रीलंका दुसरा टी-20 सामना स्थगित

कोलंबो ः वृत्तसंस्था शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाने पहिल्या ट्वेण्टी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आणि मंगळवारी (दि. 27) दुसरा सामना खेळला जाणार होता, मात्र हा सामना स्थगित करावा लागला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट …

Read More »

भारतीय हॉकी संघाकडून स्पेनचा धुव्वा

टोकियो ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. भारताने स्पेनचा 3-0ने पराभव केला. सिमरनजीत सिंह आणि रूपिंदरपाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला. भारतीय संघाला आठव्या मिनिटाला पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र सिमरनजीतकडून ती संधी हुकली. यानंतर स्पेनने आक्रमक …

Read More »

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : विदित गुजराथी उपांत्यपूर्व फेरीत

सोची (रशिया) ः वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवर 1.5-0.5 अशा फरकाने विजय मिळवत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तब्बल 19 वर्षांनी प्रथमच एखाद्या भारतीय बुद्धिबळपटूने अशी कामगिरी केली आहे.पाचव्या फेरीतील दुसर्‍या डावात विदितने पांढर्‍या मोहर्‍यांनिशी खेळताना वासिफवर 38 चालींमध्ये विजय …

Read More »

टोकियो ऑलिम्पिक : भारताची बॉक्सर लोव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत; पदकापासून एक विजय दूर

टोकियो ः वृत्तसंस्था भारताची लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. 64-69 किलोग्राम वजन गटात तिने जर्मन बॉक्सरला 3-2ने पराभूत केले. लव्हलिना ही पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. एकदा उपांत्य फेरी गाठल्यानंतर तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल. उपांत्यपूर्व सामना 30 जुलै रोजी होईल. लोव्हलिनाने संपूर्ण सामन्यात तिच्यापेक्षा अधिक अनुभवी …

Read More »

महाडचे आबा गेले; माजी आमदार माणिक जगताप यांचे निधन

महाड : प्रतिनिधीमहाडचे माजी आमदार तथा काँग्रेसचे सरचिटणीस माणिक जगताप यांचे रविवारी (दि. 25) रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. कै. माणिक जगताप यांच्यावर महाड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. …

Read More »

‘मुंबईकरांना मदत करण्यास विसरू नका’

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका. तसे झाले तर मुंबई भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना आणि महाविकास आघाडीला दिला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यावरून …

Read More »

भाजप नेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

उरण : वार्ताहर जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांचे वयाच्या 45व्या वर्षी रविवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. युवा नेतृत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या पार्थिवावर जासई …

Read More »

जनतेचा आक्रोश समजून घ्या!; भास्कर जाधवांच्या वर्तनावर फडणवीसांनी सुनावले

मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. मदतीसाठी आक्रोश करणार्‍या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकटकाळात जनतेचा आक्रोश समजून घ्यावा, असे म्हणत भास्कर जाधव यांच्या या …

Read More »

महाडकरांसाठी भाजपचा मदतीचा हात; नागरिकांना दररोज भोजन, बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीयेत महापूर आणि दरड कोसळल्याने मोठी हानी झाली. येथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आस्मानी संकटातून सावरण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाडकरांना मदतीचा हात देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी (दि. 22) तळीये गावात दुर्दैवी …

Read More »