Breaking News

Ramprahar News Team

दोन संस्थांकडून पूरग्रस्तांना मदत

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील रहेमान फाउंडेशन आणि कोकण युनायटेड फाउंडेशन यांच्या माध्यमातून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ममदापूर आणि नेरळ भागातून मदत गोळा करण्यात आली. मदतीचे 300 किट या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरातील कुंभारआळी आणि मुरारपूर भागात वाटप केले. नेरळजवळील ममदापूर येथील रहमान फाउंडेशन आणि कोकण मुस्लिम युनाइटेड फाउंडेशन …

Read More »

नेरळकरांच्या अंगणात मोरांचा नाच

मागील काही वर्षात नेरळकरांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे दररोज दर्शन होत आहे. दररोज सकाळ-सायंकाळ मोरांचे मंजूळ स्वर कानावर पडत असताना आपल्या जीवाला कोणताही धोका नाही याची खात्री झाल्याने हे मोर लोकवस्तीत येऊन मुक्त संचार करीत आहेत. इमारतींच्या माध्यमातून काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने मोडोशी भागातील असंख्य मोरांनी स्थलांतरण केले …

Read More »

नीरजचा सुवर्णाध्याय

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारताने ऑलिम्पिकच्या अ‍ॅथेलेटिक्स प्रकारात मिळविलेले हे पहिले, तर वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक आहे. नीरजच्या पदकासह भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सात पदके जिंकलीत. खेळाडूंची मेहनत आणि मोदी सरकारची साथ यातून हे साकारलेय. खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक …

Read More »

रवीकुमारला रौप्यपदक

टोकियो ः भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम लढतीत जागतिक विजेत्या रशियाच्या जावूर युगुयेवने रवीवर विजय मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रवीचे अभिनंदन केले.

Read More »

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले

मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले, तरी मुंबई लोकल अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापत बसमधली गर्दी चालते, तर मग लोकलमधील गर्दी का नाही, अशी विचारणा केली. त्याचप्रमाणे लसीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक, पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा, असेही सूचित …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना विकासकामांची भेट; विविध ठिकाणी लोकार्पण, भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 5) पनवेल तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन, तसेच इतर सामाजिक कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याचप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटील तुरुंगातच; आणखी सात दिवसांनी वाढला कारागृहातील मुक्काम

पनवेल ः कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 12 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे विवेक पाटलांचा मुक्काम सध्या तळोजा जेलमध्येच असणार आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 5 ऑगस्ट रोजी पूर्ण होत असल्याने त्यांची गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत सुनावणी …

Read More »

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पराभूत

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने स्वीडनच्या सोफिया मेडालेना धोबीपछाड देत 53 किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यानंतर काही वेळाने झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र विनेशला पराभवाला सामोरे जावे लागले. कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात …

Read More »

भारताने इतिहास रचला 41 वर्षांनी हॉकीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा पराभव करीत कांस्यपदक जिंकले. तब्बल 41 वर्षांनंतर भारताला हॉकीमध्ये पदक मिळाले. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने बलाढ्य जर्मनीचा 5-4ने पराभव केला. सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी …

Read More »

पूरग्रस्तांसाठी अखेर सरकारी मदत जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी भाजपने सातत्याने लावून धरलेली मागणी आणि जनतेचा टाहो अखेर ठाकरे सरकारच्या कानापर्यंत पोहचला असून पूरग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर करण्यात आली. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …

Read More »