कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार गायीच्या दुधाचा दर वाढवून मिळावा आणि दुधाच्या भुकटीला अनुदान मिळावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 20) एल्गार आंदोलन पुकारून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, तसेच मागणी मान्य न झाल्यास 1 ऑगस्टपासून दूध बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. …
Read More »भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अमर प्रभाकर ठाकूर, महेश जनार्दन पाटील, जगदिश विलास …
Read More »कोवॅक्सीनच्या मानवी चाचणीला ‘एम्स’मध्ये सुरुवात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात बनविण्यात येणारी कोरोना विषाणूवरील लस अर्थात कोवॅक्सीनची मानवी चाचणी घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालय सज्ज झाले आहे. मानवी चाचणीची मुख्य जबाबदारी सांभाळणारे डॉ. संजय राय यांनी ऑल इंडिया रेडिओला या संदर्भातील माहिती दिली. डॉ. राय म्हणाले की, कोवॅक्सिन या लसीची एम्स रुग्णालयात मानवी चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांची …
Read More »शरद पवार यांचा प्रभू रामचंद्रांना विरोध; भाजप नेत्या उमा भारती कडाडल्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शरद पवारांनी राम मंदिराबाबत केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील नाही, तर प्रभू रामचंद्रांविरोधातील आहे, अशी घणाघाती टीका भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी केली आहे. रामाचे मंदिर बांधून कोरोना निघून जाईल असे मोदी सरकारला वाटत आहे. त्यामुळे या मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आणि इतर …
Read More »लॉकडाऊन : रायगडात 65 जणांची आत्महत्या
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाची महामारी आणि त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदी (लॉकडाऊन)चे आता आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर या परिस्थितीचे मानसिक दुष्परिणामही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत 65 जणांनी आत्महत्या केली आहे, तर मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू …
Read More »स्फोटप्रकरणी कंपनीवर गुन्हा
खोपोली : प्रतिनिधी स्फोट होऊन दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी खोपोली येथील इंडिया स्टील कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडिया स्टील कारखान्यात 14 जुलैच्या मध्यरात्री प्रचंड स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. सिलिंडरचा हा स्फोट इतका प्रचंड होता की विहारी, सिद्धार्थनगर …
Read More »रायगड जिल्ह्यात गटारी जोरदार साजरी; मटण, चिकन खरेदीसाठी रांगा; सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली
माणगाव : प्रतिनिधी श्रावण महिन्यापूर्वी येणार्या गटारी अमावस्येचा उत्साह खवय्यांमध्ये यंदाही दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन अंशतः शिथिल झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडत चिकन, मटण व अन्य मांसाहारी पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे दर वाढूनही लोकांनी खरेदीत कसर केली नाही, मात्र या वेळी काही ठिकाणी …
Read More »महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सल्ला
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच इतर अनेक प्रश्न डोके वर काढताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधार्यांमध्ये बेबनाव आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावताना झोपेच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना …
Read More »कर्जतमध्ये जमावबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी; धबधबे, धरणे गजबजली
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील धबधबे, धरणे आणि पाणवठे यांसारख्या पर्यटनस्थळांवरील बंदी झुगारून पर्यटकांनी रविवारी (दि. 19) गर्दी केली होती. या वेळी त्यांना कुणीच रोखले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईपासून जवळ असल्याने व उपनगरीय लोकलची सुविधा असल्याने कर्जत तालुक्यातील वर्षाकालीन पर्यटनस्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. येथे शनिवार-रविवारी पर्यटकांचे …
Read More »राम मंदिर उभारणीचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या शनिवारी झालेल्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राम मंदिर शुभारंभ सोहळ्याला 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper