Breaking News

Ramprahar News Team

श्रद्धा फाऊंडेशनकडून अपंगांना मदत

कर्जत ः बातमीदार गतिमंद लोकांसाठी काम करणार्‍या श्रद्धा फाऊंडेशनने लॉकडाऊन काळात गरीब-गरजूंना मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार मागील काही दिवस कर्जत तालुक्यातील सर्व भागांत जाऊन आदिवासी, विधवा आणि गरजूंना धान्याच्या स्वरूपात मदत केली जात आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग आणि अपंग लोकांनादेखील मदत पोहचविली जात असून नेरळ परिसरातील 73 …

Read More »

लॉकडाऊनमध्ये व्यापार्‍यांकडून ग्राहकांची लूट; जीवनावश्यक वस्तूंच्या

दरात दुपटीने वाढ मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले आहेत.  याचा गैरफायदा घेत काही किराणा व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी दोन-चार दिवसांतच भाज्यांचे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात …

Read More »

‘कोरोनाबाबतची अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करावी’

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे राहणार्‍या वारगे कुटुंबीयातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा काही लोकांनी पसरवली. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा अफवा पसरविणार्‍या समाजकंठकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी अलिबाग तहसीलदारांकडे केली आहे. अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे …

Read More »

भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षपदी दीपाली जाधव

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या आदेशाने तालुका महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी माणगाव शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील सक्रिय कार्यकर्त्या दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित केली. बुधवारी (दि. 15) पक्ष कार्यालय माणगाव येथे दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित करण्यात आली. तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे …

Read More »

कर्जत तालुक्यात कडकडीत बंद; पोलिसांचा पहारा; तिन्ही जिल्हा सीमा केल्या बंद

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात येणार्‍या तिन्ही जिल्हा सीमा पोलिसांकडून बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील दोन मोठ्या आणि चार लहान अशा सर्व बाजारपेठा बंद असून गुरुवारी (दि. 16) सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. लॉकडाऊनच्या …

Read More »

नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर विलगीकरण जागेत हलवावे; भाजप नेते राजेश गायकर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर आयसोलेटेड एरियात हलवण्यात यावे, अशी मागणी राजेश नारायण गायकर, सरचिटणीस पंतप्रधान जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियान महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष, ओ.बी.सी. मोर्चा , रायगड यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदन दिले आहे. गायकर …

Read More »

वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील खोदकामाला ग्रामस्थांचा विरोध; बीपीसीएल कंपनीविरोधात आक्रमक भूमिका

मोहोपाडा : प्रतिनिधी दांड रसायनी रस्त्यालगत वावेघर हद्दीत बीपीसीएल कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केल्याने वावेघर ग्रामपंचायतीने सुरु असलेल्या कामास प्रतिबंध करुन काम थांबविले आहे. बीपीसीएल कंपनीकडून वावेघर ग्रामपंचायतीला कोणतेही कागदपत्र अथवा परवानगी न घेता काम सुरु केल्याने वावेघर ग्रामपंचायतीकडून कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठीचे सुचना पत्र देण्यात आले होते. परंतु …

Read More »

चिरनेरचा पिढ्यान्पिढ्या सुरू असणारा गणेशमूर्ती व्यवसाय कोरोनामुळे संकटात

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील पिढ्यान्पिढ्या सुरू असलेला शाडू मातीपासून तयार करण्यात येत असलेल्या गणेश मूर्तींचा व्यवसाय यंदा कोसळलेल्या कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या फैलावामुळे संकटात आला असून, 50 ते 60 टक्के व्यवसायाला उतरती कळा आली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच राज्य शासनाने गणेशमूर्तीच्या उंचीला निर्बंध घातल्याने मोठ्या मूर्तींच्या …

Read More »

उरण नगर परिषदेकडून कोरोना सर्वेक्षण सुरू

उरण : वार्ताहर  उरण शहरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करण्याबाबत या अनुषंगाने उरण नगरपरिषद वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या  मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या हददीतील नागरिकांची माहिती, सर्वेक्षण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उरण नगरपरिषद हद्दीत ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा भागात तसेच परिसरात …

Read More »

पनवेल तालुक्यात 251 नवीन कोरोना रुग्ण; चौघांचा मृत्यू; 156 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 15) कोरोनाचे 251 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा  मृत्यू  झाला आहे. तर 156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या बळींचे शतक पूर्ण झाले. बुधवारी 180 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 121 रूग्ण बरे झाल्याने …

Read More »