कर्नाळा (ता. पनवेल) : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणीही फिरकत नाही. त्यामुळे जलाशये मोकळा श्वास घेत आहेत. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »22nd July 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
कर्नाळा (ता. पनवेल) : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणीही फिरकत नाही. त्यामुळे जलाशये मोकळा श्वास घेत आहेत. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील इंडिया बुल्स येथे विलगीकरण कक्षातील एका महिलेवर अत्याचार करणार्या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी पनवेल तालुका बार कौन्सिल असोशिएशनकडे विविध राजकीय संघटना व संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये त्याचप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणीसुद्धा …
Read More »उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानमाळात पूर्वी ठिकठिकाणी पावसाळ्यात आढळणारी टाकळा ही वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण अशी रानभाजी म्हणून ओळखली जाते. ही नैसर्गिक रित्या उगवलेली रानभाजी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे उरण तालुक्यातील वशेणी येथील इतिहास संपादकीय मंडळाच्या निरिक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे टाकळा या भाजीचे संवर्धन करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय …
Read More »स्वराज्याचे प्रणेते म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या अनेक घोषणा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रेरणा ठरल्या. टिळकांनी अहमदनगरमध्ये भर पावसात एका सभेत उच्चारलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याने देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि ती मशाल पुढे सलग 31 वर्षे तशीच पेटत राहीली. भारतीयांना …
Read More »नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारी असो की इतर कोणताही साथीचे आजार! या कालावधीत नागरिकांना मिळणारे सल्ले तंतोतंत पाळले गेले. तर आपण त्यावर सहज मात करू. पण आपले काही नागरिक अशा मार्गदर्शनाला पायदळी तुडवून आपल्या मनाप्रमाणे वागत असल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांनी आपली मानसिकता बदलली तर कोरोनासारख्या …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे या वर्षी गणेशोत्सवावर विरजण पडले आहे. बाप्पांचे अगमन जवळ आले, तरी बाजारात कोणतीही लगबग दिसत नाही. गणपती स्टॉलचाही पत्ता नाही. त्यामुळे अनेक कारागिरांनी बाप्पाच्या मूर्तीची विक्री ऑनलाइनद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल परिसरात या ऑनलाइन नोंदणीला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. सध्या बाप्पाची वेगवेगळी रूपे …
Read More »नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनामुळे 500पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील 68 टक्के नागरिक 50पेक्षा जास्त वयोगटांतील आहेत. ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात अडकत असून, शरीर उपचारास साथ देत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये व राज्य शासनाकडून …
Read More »पनवेल ः प्रतिनिधी खारघरमध्ये राहणार्या मामा-भाच्याला पॅनासोनिक कंपनीचे सोलारवर चालणारे एसी विक्रीची डिलरशिप मिळवून देण्याचा बहाणा करून मामा व त्याच्या भाच्याला 85 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरांच्या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या मामा-भाच्याचे नाव नंदकुमार द्विवेदी व …
Read More »मोहोपाडा ः प्रतिनिधी कष्टकरीनगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी विश्वनाथ गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट बोलून दाखविला. अण्णा भाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत जाऊन स्वतःच्या महत्त्वाकांक्षांवर लिहायला- वाचायला शिकून त्यांच्यामधील प्रतिभावंत विचारांना जागा मोकळी करून दिली. …
Read More »कळंबोली ः प्रतिनिधी श्रावण महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्रात महादेव मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे श्रावणी सोमवारी शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरासमोर रांगा लागतात, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार आहेत. त्यामुळे यंदा …
Read More »