पनवेल : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यात 21 एप्रिलपर्यंत 60 हजार 5 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, 2 कोटी 30 लाख 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या काळात 121 पोलिसांवर हल्ला केल्याने 411 जणांना अटक करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील दोन घटनांचा समावेश असून, तीन …
Read More »लॉकडाऊनकाळात गरजूंना जेवण
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असणारे व्यक्ती, मजूर, आदिवासी बांधव यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मायेचा घास मिळावा व संकटसमयी कोणीही उपाशी राहू नये या हेतूने अजय टाटनवा यांनी स्वखर्चाने त्यांना जेवण दिले आहे. अजय टाटनवा यांनी सांगितले …
Read More »रोह्यात पोलिसांकडून हजारो वाहनचालकांवर कारवाई
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये रोह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून विनाकरण फिरणार्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. विनाकारण बाहेर फिरणार्या नागरिकांनाही घरी जाण्याच्या व घरातच राहण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून देण्यात येत आहेत. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गाड्या रस्त्यावर उतरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीसुध्दा …
Read More »रिलायन्स फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मोहोपाडा ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात गोरगरीब कुटुंबांसाठी कैरे येथील माजी उपसरपंच सुरेश पाटील व माजी सरपंच अविनाश पाटील यांनी रिलायन्स पाताळगंगा व्यवस्थापनाशी चर्चा करून परिसरातील गरजू नागरिकांना व आदिवासी बांधवांना रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. या वेळी कैरे पाताळगंगा विभागातील आदिवासी वाड्या व गरजू, गोरगरिबांना जिल्हा …
Read More »नागोठण्यात काही व्यवसायांस सशर्त परवानगी
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये 20 एप्रिलपासून काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात व्यापारी संघटनेच्या सूचनेनुसार सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी, रोहे तहसील कार्यालय व संबंधित यंत्रणेशी प्रत्यक्ष संवाद साधून व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. सदर बैठकीत अनेक निर्णय निश्चित करण्यात आले. त्यात …
Read More »रायगडात 1,03,026 व्यक्तींची ‘घरवापसी’; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
अलिबाग, माणगाव : प्रतिनिधी कोरोनामुळे टाळेबंदी (लॉकडाऊन)च्या काळात मुंबई, पुण्यासह अन्य भागातील चाकरमान्यांनी सुरक्षित ठिकाण म्हणून गावाकडची वाट धरली. जवळपास एक लाखाहून अधिक चाकरमानी रायगड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आले आहेत. यात सर्वाधिक चाकरमानी माणगाव, तर सर्वांत कमी पनवेल तालुक्यातील आहेत. माणसांचा लोंढा वाढल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्याचप्रमाणे …
Read More »खांदा कॉलनीतील झाडांच्या फांद्याची मान्सूनपूर्व छाटणी करावी; सभापती संजय भोपी यांची मागणी
कळंबोली ः प्रतिनिधी खांदा कॉलनीतील झाडे ही मोठ्या प्रमाणात उंच व विस्तीर्ण आहेत. या झाडांची निगा राखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याकरिताही नेहमीच टाळाटाळ केली जाते. पावसाळ्यात वादळी वार्यामुळे ही झाडे खाली येऊन मनुष्य व आर्थिक हानी होऊ शकते. तेव्हा या विभागातील अस्ताव्यस्त वाढलेल्या …
Read More »खोपोलीत लॉकडाऊनचे नियम पायदळी; सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा; संचारबंदी उठल्यासारखी स्थिती
खोपोली ः प्रतिनिधी नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण या भागातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. दरम्यान, श्रीवर्धन, पोलादपूर व आता कर्जत तालुक्यातील नेरळमध्येही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर खोपोली व खालापूर तालुक्यात प्रशासनाकडून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र याचा कोणताही गंभीर परिणाम …
Read More »चौक पोलिसांची गांधीगिरी: दुचाकीस्वारांत घबराट
खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये नागरिकांना वारंवार घरातच राहण्याचे आवाहन करूनही विनाकारण दुचाकीवरून फिरणार्यांना सोमवारी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. चौक बाजारपेठेत विनाकारण फिरणार्यांची संख्या वाढत आहे. चौक पोलिसांनी बाजारपेठेबाहेर बाजारात खरेदीसाठी येणार्या बाइक व फोर व्हीलरची पार्किंगची व्यवस्था केली आहे. तरीही काहींचे बाजारात बाइक घेऊन फिरणे सुरूच होते. व्यापारी असोसिएशनने जनता …
Read More »‘नाका कामगारांना आर्थिक मदत करावी’
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यावर नागरिकांत संसर्ग पसरू नये यासाठी राज्यात टाळेबंदी केल्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. परिणामी नाका कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, असे निवेदन श्रमिक कला कौशल्य विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी तहसीलदारांकडे दिले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper