कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना आक्रमक झाली होती, मात्र त्यांच्या अनेक मागण्या मध्य रेल्वे प्रशासनाने मान्य केल्या आहेत. दरम्यान, मागण्या मान्य झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविणार नाही, असे प्रवासी संघटनेने जाहीर केले आहे. नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना गेली …
Read More »वणवे उठताहेत वनसंपदेच्या मुळावर; पशुपक्षी, ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात; ठोस उपाययोजना करण्याची गरज
पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात माळरान, गडकिल्ले, जंगल भागात मोठ्या प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते, मात्र ऑक्टोबरनंतर ही झाडीझुडपे व गवत सुकते आणि कळतब नकळत डोंगराला वणवा लागतो. रायगड जिल्ह्यात दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर असे वणवे लागतात. या वणव्यात झाडेझुडपे, पशुपक्षी, सूक्ष्म जीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होतो. …
Read More »रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात
पेण ़: प्रतिनिधी रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा सहावा वर्धापन दिन संघाचे अध्यक्ष स. रा. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या संघाच्या वटवृक्ष या स्मरणिकेचे प्रकाशन सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदे मातरम् शाळेच्या विद्यार्थ्यांनी …
Read More »शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची खालापूर येथे बैठक
कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नुकतीच सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर येथील प्रगतशील शेतकरी नारायण बाळकृष्ण जगताप यांच्या शेतावर घेण्यात आली. प्रत्येक तालुका कृषी कार्यालयात स्थापन झालेल्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. …
Read More »अलिबागेत वीजवाहिन्या होणार भूमिगत
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहरात वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. वीजवाहिन्या भूमिगत झाल्यानंतर अलिबाग शहरात विजेच्या तारा तुटून, खांब कोसळून अपघात होण्याचा धोका टळणार आहे. चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वरून जाणार्या विजेच्या तारा तुटून, पोल कोसळून अनेक प्रकारे …
Read More »मुंबई : राष्ट्रीय पातळीवरील टेनिस चॅम्पियनशिप नुकतीच नरिमन पॉइंट येथे झाली. यामध्ये 12 वर्षांखालील गटात उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा टेनिसपटू ओम वर्मा याने विजेतेपद पटकाविले. त्याला पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Read More »उरणच्या कराटेपटूंची राष्ट्रीय स्तरावर निवड
उरण : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील कोळखे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उरण व केळवणे येथील गोशीनरियु कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची बंगळुरूत होणार्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत शुभम नितीन ठाकूर, कक्षा रमेश म्हात्रे, आर्वी निवृत्ती केदारी, यश जितेंद्र पाटील, मिथिल पाटील यांनी प्रत्येकी दोन …
Read More »जाफरच्या नावावर महाविक्रम
नागपूर : प्रतिनिधी रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाकडून खेळणार्या वासिम जाफरने आतापर्यंत कोणाला जमली नाही अशी कामगिरी केली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या केरळविरुद्धच्या सामन्यात जाफरने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 12 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे जाफर रणजी स्पर्धेत 150वा सामना खेळत आहे. …
Read More »बास्केटबॉल स्पर्धेला खांदा कॉलनीत प्रतिसाद; महान खेळाडू कोबी ब्रायंट यांना श्रद्धांजली
पनवेल : वार्ताहर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचे नुकतेच दुर्दैवी अपघाती निधन झाले. या महान खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने ब्लॅक मांबा बास्केटबॉल स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक विक्रांत …
Read More »युवा चेहर्यांना संधी; पृथ्वी शॉचे पुनरागमन; अग्रवाल, गिल, विहारी, सैनीलाही स्थान; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे उर्वरित न्यूझीलंड दौर्याला मुकावे लागल्यानंतर भारतीय निवड समितीने कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणार्या लोकेश राहुलला वगळण्यात आले आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने कसोटी संघात पुनरागमन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper