Breaking News

Ramprahar News Team

विकासपूर्व कामे अंतिम टप्प्यात, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचा विश्वास

पनवेल : बातमीदार सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या अगोदर करावयाची विकासपूर्व कामे अजून सुरूच आहेत. यात सर्वधिक महत्त्वाचे असलेले टेकडी सपाटीकरण, नदीचा प्रवाह बदलणे आणि दहा गावांचे स्थलांतर करून ती जागा मिळवून देणे ही कामे आता अंतिम टप्प्यात असून, या वर्षीच्या डिसेंबरअखेर …

Read More »

पायी दिंडीचे धाकटी पंढरीला प्रयाण

मोहोपाडा : वार्ताहर श्री विठ्ठल पायी कोकण दिंडी आयोजित स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कांबेकर महाराज, सुखनिवासी गोमाजीबाबा गायकर, सुखनिवासी भगोजीबाबा, सुखनिवासी झिपरूबाबा, सुखनिवासी गणपतबाबा मुकादम, गुरुवर्य लक्ष्मण महाराज म्हसकर आणि गणेश सर यांच्या कृपाशीर्वादाने साजगाव येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. शिवव्याख्याते कीर्तनकार हभप संतोष महाराज सते यांच्या कुशल मार्गदर्शनाने भाताण …

Read More »

पोदी भागातील भुयारी मार्ग रखडला, महावितरणच्या टॉवरमुळे डिसेंबर 2017 पासून काम बंद

पनवेल : बातमीदार पनवेल रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पोदीवर जाण्यासाठी फाटकामधून जाणे, अजून तरी टळण्याची चिन्हे नाहीत. त्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. महावितरणची वीजवाहिनी काढण्यास विलंब झाल्यामुळे हे काम रखडले आहे. नवीन पनवेल सेक्टर 15, 15 ए, 16, तसेच पोदी आणि विचुंबे गाव या भागात पनवेलकडून वाहने घेऊन …

Read More »

भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, आघाडीसोबत जाणार्या शिवसेनेला शुभेच्छा! -चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी सत्तास्थापनेसंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर …

Read More »

चक्रीवादळांमुळे रायगड जिल्ह्यातील 22,677 हेक्टर भातशेतीचे नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील 22 हजार 677  हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. एक हजार 701 गावांतील 67 हजार 51 शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला …

Read More »

महाराष्ट्रात होणार थंडीचे आगमन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. सद्यस्थितीत राज्यात कोठेही पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लांबलेल्या पावसामुळे सुमारे पाच महिन्यांनंतर राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे बहुतांश भागातील तापमानात घट होणार असल्याने थंडी अवतरणार असल्याची चिन्हे आहेत. जूननंतर पाच महिन्यांत काही …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून तलवारबाज विद्यार्थ्यांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे रविवारी (दि. 10) अभिनंदन केले. हरियाणा येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील तलवारबाजी स्पर्धा चाचणी …

Read More »

आनंदोत्सव पनवेल : अयोध्येतील जमीन ही रामलल्लाची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. त्यामुळे विरुपाक्ष मंदिरात दिवे लावून व आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More »

भिंगार येथे मुलांना टी-शर्ट वाटप भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष जेठू पाटील यांच्या माध्यमातून भिंगार गावातील मुलांसाठी टी-शर्टचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा नेते योगेश लहाने, भिंगारचे सरपंच …

Read More »

नवीन पनवेलमध्ये कराटे चॅम्पियनशिप शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात फस्ट कराटे फीस्ट चॅम्पियनशिप पनवेल 2019 ही स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी प्रेसिडेंट अतुल बोरा, सेक्रेटरी शैलेश …

Read More »