विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत मात करीत मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी नऊ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या संघाने दोन सत्रांमध्येच विजय साकारला. दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी (5/35) आणि रवींद्र जडेजा (4/87) यांच्या …
Read More »प्रेमीयुगुलाची आत्महत्या
नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोलीतील सिम्फ्लेक्स वसाहतीत राहाणार्या एका तरुणाने राहत्या घरात आपल्या प्रेयसीसोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय वरे (24) आणि साक्षी गोळे (19, रा. कोपरखैरणे) अशी या दोघांची नावे असून, त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दत्तात्रय वरे हा माथाडी कामगार म्हणून काम …
Read More »सांगली आणि नाशिकला परतीच्या पावसाने झोडपले
नाशिक, सांगली : प्रतिनिधी नाशिक, सांगलीसह राज्यातील इतर भागाला परतीच्या पावसाने झोडपले आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला, तर नाशिकमध्ये रविवारी (दि. 6) ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये कालिका देवीच्या यात्रेनिमित्त जमलेले भाविक आणि तेथील विक्रेत्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. रविवार असल्याने हजारो भाविक …
Read More »शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात; किरकोळ दुखापत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात होऊन त्यांच्या पत्नी शर्मिला यांना मुका मार बसला, तर चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना शनिवारी (दि. 5) हा अपघात झाला. नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक …
Read More »रायगडात 112 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध
अलिबाग : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघातील 131 उमेदवारांपैकी 112 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र वैद्य ठरली आहेत, तर 19 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत. 188-पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये 18 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून पाच उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध ठरली आहेत. 189-कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज 17 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध …
Read More »दोन कोटी भारतीयांचा डीटीएचला राम राम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टेलिव्हिजन आणि ब्रॉडकास्टिंग सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या घोषनेनंतर भारतात नवे दर लागू झाल्यानंतर डीटीएच सेवा महाग झाली आहे. डीटीएच सेवेसह केबलच्या बिलात भरमसाठ वाढ झाल्याने लोक हैराण झाले आहेत. ट्रायने लोकांना पसंतीचे चॅनेल निवडण्याची मुभा दिली असली, तरी डीटीएच सेवा महाग झाल्याने …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या अर्जावरचे सर्व आक्षेप फेटाळले
नागपूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावरचे सगळे आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. निवडणूक अधिकार्यांनी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी डॉ. आशिष देशमुख, प्रशांत पवार आणि इतर उमेदवार यांनी याबाबत हरकत उपस्थित केली. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दाखल केलेल्या …
Read More »मोरा गावची एकवीरा देवी
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील उरण नगरपालिका हद्दीतील मोरा कोळीवाडा गावातील डोंगरावर असलेली सर्व कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेली, मोरा गावाची आराध्यदैवत व जागृत देवस्थान असलेल्या श्री एकविरा देवी होय. गावाजवळील डोंगरावर वसलेली असून जवळच डोंगरावरील मोठा पाण्याचा झरा (धबधबा) बाराही महिने वाहत असतो, देवीचा महिमा मोठा असल्याने उरण तालुक्यातून भक्त …
Read More »महिलेचा विनयभंग करणार्यास अटक
पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर परिसरात 19 ऑक्टोबर रोजी रात्री एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील आरोपी हा अतिशय चाणाक्ष व हुशार असून एकांत ठिकाणावरून जाणार्या महिलेचा विनयभंग करून आरोपी पळून जात असे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपीचा शोध पोलीस घेत होते. …
Read More »कुटुंबाचा आधारस्तंभ बनलेली उरणमधील नवदुर्गा
उरण ः रामप्रहर वृत्त उरणमधील कोप्रोली गावातील अश्विनी अजित पाटील या नवदुर्गेने पतीच्या निधनानंतर न डगमगता स्वकर्तृत्वाने उभारी घेतली आहे. पतीच्या निधनानंतरही या महिलेने जिद्द कायम ठेवत मेहनतीवर विश्वास ठेवला आहे. यामुळे ही महिला उरण तालुक्यातील मेहनत करणार्यांसाठी आशेचे उदाहरण बनली आहे. अश्विनी अजित पाटील यांचा दिवस पहाटे 3 वाजता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper