पेण : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीत रिंगरोड उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून 53 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातून करण्यात येणार्या 11 विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 12) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयोजित केले आहे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ …
Read More »नानवेल दीपगृह बंद; रात्री दिशा समजत नसल्याने होड्या भरकटल्या
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोर्लईजवळ मणेरी तर दिघी गावानजीक नानवेल ही दोन दीपगृहे आहेत. त्यातील नानवेल येथील दीपगृह गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. तेथील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मच्छीमारांच्या होड्या भलत्याच ठिकाणी भरकटल्या जात आहेत. खोल समुद्रात जाणार्या बोटींना दिशा दाखविण्यासाठी दीपगृह मार्गदर्शक ठरतात. रात्रीच्या वेळी दीपगृहातील दिवे …
Read More »अतिरिक्त कर आकारणीला खोपोलीत विरोध
खोपोली : प्रतिनिधी येथील नगर परिषदेने चालू वर्षीच्या मालमत्ता कर मागणी पावतीमध्ये कचरा संकलन या नावाने 480 रुपये अतिरिक्त कर आकारणी केली आहे. हा अतिरिक्त कर कशासाठी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या अतिरिक्त कराला खोपोली शहरातून विरोध वाढत आहे. खोपोली नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये यापूर्वीच वृक्षकर, शिक्षण कर, स्वच्छता …
Read More »राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ यांचा राजीनामा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ आणि त्यांचे वडील राष्ट्रवादीचे जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू होती, मात्र काही दिवस त्यांनी वेट अँड …
Read More »शेकाप पक्षाला पुन्हा धक्का; माजी सरपंच, सदस्य, कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पेण : प्रतिनिधी निगडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा नाईक व माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेकाप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 11) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. पेण तालुक्यातील निगडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक व त्यांच्या पत्नी माजी सरपंच सुनंदा जनार्दन नाईक …
Read More »शिकार व पाळीव प्राण्यांचे खेळ; कायद्याआड परंपरा
दक्षिण भारतातील जलीकट्टू आणि पाश्चात्य देशातील बुलफाईट्स असे मैदानी रांगडे खेळ कोकणातील रेड्यांच्या झोंब्यांप्रमाणेच ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली नाळ दाखवितात. कोकणातील पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे अविभाज्य अंग कधी-कधी शहरी सामाजिक संघटनांच्या भूतदयेच्या अनाकलनीय ’सोशल वर्क’मुळे बेकायदेशीर ठरते, तेव्हा रेड्यांच्या झोंब्या, कोंबड्यांची झुंज, मेंढ्यांच्या टकरा, बैलगाड्यांच्या शर्यती अचानक कायद्याच्या कचाट्यात सापडतात. वास्तविक पाहता …
Read More »विज्ञाननिष्ठेचा वसा
नासा या अग्रणी अंतराळ संशोधन संस्थेकडून इस्रोची प्रशंसा झालीच असून चीन, जपान, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी इस्रोचे कौतुक केले आहे. इस्रोनेही आपली मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचे म्हटले असून अर्थातच लँडरशी संपर्काचे प्रयत्न आणखी काही दिवस सुरूच राहतील. देशाचे दुसरे चांद्रयान 22 जुलैला चंद्राच्या …
Read More »गव्हाण येथे सिडकोच्या इंटीग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर कामाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या 12.5 टक्के योजनेंतर्गत गव्हाण येथे इंटीग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या भूमिपूजनावेळी कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन भगत, ग्रामपंचायत सदस्य विजय …
Read More »महेश बालदी यांच्याकडून आदिवासी मुलाला लॅपटॉप
उरण ः रामप्रहर वृत्त रानसई आदिवासी वाडीमध्ये राहणारा विकास नारायण बरतोड हा सिव्हिल इंजिनिअरिंगला असून त्याला शिक्षणाची आवड आहे. त्यास प्रोजेक्टसाठी लॅपटॉपची गरज होती, पण लॅपटॉप घेण्याइतकी त्याची परिस्थिती नाही. ही बाब जेव्हा भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष समीर मढवी यांना रानसईच्या सरपंच गीता भगत यांचे पती अनिल भगत व …
Read More »ओवळे गावाचे पुनर्वसन झालेच पाहिजे; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बैठकीत मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त पर्जन्यवृष्टीमुळे व विमानतळाच्या भरावामुळे ओवळे गावात पाच फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर ओवळे गावाच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी (दि. 9) बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक ओवळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper