Breaking News

Ramprahar News Team

सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील दुदंडी गावात पूरग्रस्तांना मंगळवारी चादर, सफरचंद, बिस्किटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल मनपाचे नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, संतोष भगत, मा. जि. प. सदस्य शिवाजी मगर पाटील, अनिल चव्हाण, पं. स. सदस्य रामभाऊ वरोडे, मा. सरपंच माणिक ठोंबरे आदी उपस्थित होते.

Read More »

सुकापूर येथील 51 इमारती धोकादायक

पनवेल : बातमीदार सुकापूर (पाली देवद) येथील 51 इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या इमारती खाली करण्यासाठी रहिवाशांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या आहेत. नवीन पनवेललाच लागून सुकापूर गाव असल्याने येथे लोकवस्ती वाढू लागली आहे. मोठ-मोठे बांधकाम व्यावसायिक सुकापूर परिसरात आल्याने नागरीकीकरण प्रचंड वाढले आहे. 35 ते 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या काही इमारती …

Read More »

गव्हाण विद्यालयात नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन उत्सव

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रक्षाबंधन आणि आगरी कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा उत्सव हे दोन्ही सण हर्षोल्हासात साजरे करण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या समारंभात विद्यार्थिनींनी विद्यार्थी व शिक्षकांना आणि वृक्षांनाही राख्या बांधल्या. या सृष्टीचे …

Read More »

रोपवेची मंजुरी अंतिम टप्प्यात ; जगातील सर्वात लांब ठरणार एलिफंटा-शिवडी प्रकल्प

उरण : बातमीदार मुंबईच्या किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलिफंटा-शिवडी रोपवे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने याबाबत आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याची ग्वाही केंद्रीय नौकानयन मंत्रालयाला दिली आहे. पर्यटनमंत्र्यांची नुकतीच याबाबत नौकावहन मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. त्यात हा प्रकल्प पूर्णत्वास …

Read More »

पोलादपूरची शहीद परंपरा

रायगड जिल्ह्याच्या शहीद परंपरेची सुरुवात पोलादपूर तालुक्यातील दुसर्‍या महायुध्दातील पहिले शहीद खडपी येथील सयाजी जाधव यांच्यापासून झाली असून त्यानंतर कोंढवीचे अनाजी चव्हाण, भरत मोरे, लक्ष्मण निकम, चिखलीचे तानाजी बांदल, परसुलेचे बाबूराम जाधव, लोहारे पवारवाडीतील सुरेश भोसले, वाकण धामणेचीवाडीतील देऊ सकपाळ, पार्लेतील लक्ष्मण गमरे, तुर्भे खोंडा येथील गणपत पार्टे, आडावळे येरंडवाडीतील …

Read More »

सरकारच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा सुनील तटकरेंचा डाव भाजप नेते कृष्णा कोबनाक यांचा हल्लाबोल

म्हसळा : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन पर्व- नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त म्हसळा तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 13) येथील  कुणबी समाज सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात म्हसळा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजप सरकारने सुरू केलेल्या महिला बचत गट, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या योजना, मातृ …

Read More »

कोंडरान गावाजवळ झालेल्या भूस्खलनाने ; शेतीचे नुकसान; 48 जनावरे दगावली

महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेली दोन आठवडे मुसळधार पाऊस होत होता. मात्र 6 ऑगस्ट रोजी किल्ले रायगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीने जागोजागी भूस्खलन झाले आहे. त्याचे भयाण रूप कोंडरान आणि कोंझर गावादरम्यान दिसून येत आहे. याठिकाणी आलेल्या मातीने शेकडो एकर भात शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण शेत जमिनीत माती, झाडांच्या फांद्या, …

Read More »

मुंबई-पंढरपूर एसटी बसला खालापुरात अपघात

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी समोरून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने हुलकावणी दिल्याने एसटी बसचालकाने तत्काळ ब्रेक दाबला. त्यामुळे बस रस्त्यावरून घसरून अपघात झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी वांवढळ (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत कमल हॉटेलजवळ घडली. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. ही बस (एमएच-14,बीएल-9389) मंगळवारी सकाळी मुंबई सेंट्रल येथून …

Read More »

रायगडातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, अलिबागमधील डॉक्टरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये

अलिबाग : प्रतिनिधी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अलिबागच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागात कपडे, औषधे, खाण्याच्या वस्तू, भांडी ही वस्तूरूपी मदत पाठविण्यात आली आहे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची मदत चेकद्वारे देण्यात आली आहे. आयएमए अलिबाग शाखेतर्फे डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात पाठविण्यासाठी कपडे, खाण्याच्या वस्तू, भांडी, औषधे गोळा …

Read More »

रायगड जिल्हा रुग्णालयात लवकरच बोट अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच रुग्णवाहिका सागरी बोटीची (बोट अ‍ॅम्ब्युलन्स) सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शासकीय रुग्णालयाने शासनाकडे पाठविला आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांना मुंबईत योग्य वेळेत चांगले उपचार मिळू शकतील. जिल्ह्याच्या विविध भागांतून रुग्ण अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. …

Read More »