Breaking News

Ramprahar News Team

आला पावसाळा आहार सांभाळा

सध्या पाऊस भरपूर प्रमाणात पडत आहे. पावसाळयात आजारांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर पावसाळयात आहाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबतचा लेख. आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालामध्ये विभाजन केले आहे. या सहा कालखंडालाच ऋतू असे म्हटले आहे. प्रत्येक ऋतूत आढळणारे हवामान, आजुबाजूची परिस्थिती त्या कालावधित शरीरात …

Read More »

तंत्रज्ञानासोबतची जोखीम

तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसलेली मंडळी कित्येकदा अशा अ‍ॅप्सवरील खाजगीपणाच्या सेटिंग्जबद्दल अनभिज्ञ असतात. अज्ञानापोटी अशी खाजगी छायाचित्रे चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागल्यास त्यांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. कधी कधी तर ध्यानीमनी नसताना तंत्रज्ञानाच्या साह्याने कुणीतरी तुमच्या खाजगीपणावर आकस्मिक घाला घालू शकतो असेही आता अनेक प्रकरणांतून अघडकीस येऊ लागले आहे. तंत्रज्ञानामुळे आपले खाजगीपण …

Read More »

रायगडात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 2) दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी व खाडी किनार्‍यावरील तसेच डोंगर उतारावर असणार्‍या गावांना जिल्हा प्रशासनाने  सतर्कतेचा इशारा दिला आहे.  गुरुवारी पावसाचा जोर कमी होता. आजही सकाळी पावसाने काहीशी …

Read More »

उरण शहरात बेशिस्त वाहनांवर कारवाई

उरण ः वार्ताहर उरण शहरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच असून, या वाहतूक कोंडीमुळे बाहेरून शहरात येणार्‍या तसेच उरणवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी त्यांच्या वाहतूक पोलीस पथकासह उरणमध्ये बेशिस्त वाहन चालविणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस नायक …

Read More »

कामगार दिनानिमित्ताने कर्मचारी मार्गदर्शन मेळावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने राष्ट्रीय सफाई कामगार दिनानिमित्ताने भव्य कामगार कर्मचारी मार्गदर्शन मेळावा ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कामगार कर्मचारी मेळाव्याचे उदघाटन युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  संतोषभाई घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, …

Read More »

महासभेवेळी संविधानाची प्रत ठेवून कामकाज करावे -प्रकाश बिनेदार

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेच्यावेळी भारतीय संविधानाची प्रत ठेवून सभेचे कामकाज चालवावे, अशी मागणी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. अनेक महानगरपालिकेत महासभेचे कामकाज चालू होताना ‘राजदंड’ सभेत ठेवला जातो परंतु राजदंड ठेवण्यास कोणताही कायदेशीर आधार आहे किंवा नाही, याची कल्पना …

Read More »

‘साहित्यसंपदा’चे दुसरे साहित्य संमेलन उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे नुकतेच दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28 जुलै) झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार ए. के. शेख, तर स्वागताध्यक्ष स्मित शिवदास होते. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. या वेळी ग्रंथोत्सवाचे …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये हालचालींना वेग; 28 हजार सैनिक तैनात

श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असतानाच खोर्‍यात सुरक्षा दलाच्या 280 कंपन्या (28 हजार जवान) तैनात करण्यात येत आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील तसेच खोर्‍यातील इतर ठिकाणांवर जवान तैनात केले जात आहे. या सुरक्षा दलांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि भारत-तिबेत …

Read More »

खाजगी उद्योगातही आरक्षण! माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांची माहिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाच्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे मागास समाजांना खाजगी उद्योगातही आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठी गरज आहे ती राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्ती असण्याची, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. ते गणराज्य अधिष्ठान या संघटनेने मुंबई मराठी पत्रकार …

Read More »

श्रीनंद पटवर्धन यांना मातृशोक

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन यांच्या मातोश्री मंदाकिनी पटवर्धन यांचे गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धत्वाने निधन झाले. मंदाकिनी पटवर्धन यांच्यावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश …

Read More »