Breaking News

Ramprahar News Team

सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

मुरुड : संजय करडे पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धरणावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी होऊ लागली आहे. एका बाजूला उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, तर दुसर्‍या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेली खोल दरी. हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनूभव आल्याशिवाय …

Read More »

विवेक भालेराव, युवराज वलिंद्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार  महापुरात नाला पार करीत असताना दहिगाव इंजिवली (ता. कर्जत) येथील विवेक भालेराव (वय 17) तरुण वाहून गेला होता. राज्य शासनाच्या वतीने मृत विवेकचे वडील बबन भालेराव यांना शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गटारात पडून मृत्यू पावलेल्या माथेरानमधील युवराज या बालकाचे वडील धीरज वारीद्रे यांना …

Read More »

राजनाल्याचा बांध फुटल्याने शेतीचे नुकसान

कडाव : प्रतिनिधी मागील चार-पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील राजनाल्याचा बंधारा तांबस गावाजवळ फुटल्याने परिसरातील भात लागवड झालेल्या जमिनीचे  नुकसान झाले. मात्र अद्यापही या ठिकाणी स्थानिक यंत्रणा फिरकली नसल्याने शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. 26 आणि 27 जुलै रोजी कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यात कर्जत तालुक्यातील …

Read More »

पाली येथील जुन्या पोलीस ठाण्याची भिंत ढासळली

पाली : प्रतिनिधी येथील रामआळीजवळ ब्रिटिशकालीन दगडी इमारतीमध्ये पोलीस ठाणे आणि न्यायालय होते. मुसळधार पावसामुळे या इमारतीची भिंत कोसळली. त्यामुळे येथून जाणार्‍या येणार्‍यांसाठी धोका निर्माण झाला आहे. या ब्रिटिशकालीन चिरेबंदी वास्तूत पोलीस ठाणे आणि न्यायालयासह तहसील व उपलेखा कार्यालय देखील होते. ही सर्व कार्यालये नवीन इमारतीत हालविण्यात आली आहेत. त्यामुळे …

Read More »

खोपोली रेल्वेस्थानक मार्गावर खड्डे व पाणीच पाणी

खोपोली : प्रतिनिधी खोपोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. येथील रेल्वेस्थानक रोडवर मोठमोठे खड्डे व मोठ्या प्रमाणात  पाणी साचत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या पूर्वी डागडुजी म्हणून नगरपालिकेकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र मागील चार पाच दिवसातील मुसळधार पावसामुळे येथे टाकलेली खडी व कच पूर्ण वाहून …

Read More »

पोलादपुरात सलग पाचव्या दिवशी संततधार

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहू लावणारा पाऊस सलग पाचव्या दिवशीही संततधार बरसत होता. पोलादपूर शहरातून वाहणारी सावित्री सध्या विशालरूप घेऊन खळाळत आहे. पोलादपूर तालुक्यात 24 जुलै रोजी 94 मि.मी., 25 जुलै रोजी 70 मि.मी., 26 जुलै रोजी 96 मि.मी., 27 जुलै रोजी 209 मि.मी., 28 जुलै …

Read More »

रायगडात वरुणराजाची रिपरिप सुरूच ; नागोठण्यात पुन्हा पूर

नागोठणे : प्रतिनिधी रात्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने मंगळवारी (दि. 30) पहाटे आपले पात्र ओलांडून शहराच्या अनेक भागात प्रवेश केला.  त्यामुळे शुक्रवारी रात्री ते रविवार सकाळपर्यंत पुराचा अनुभव घेतलेल्या नागोठणेकरांना मंगळवारी पुन्हा एकदा पुराला सामोरे जावे लागले. नागोठणे एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मरिआई मंदिर भागात पुराचे पाणी भरले होते. …

Read More »

पावसाच्या पाण्यावर तयार झालेल्या भाज्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल

खोपोली : प्रतिनिधी आदिवासी बांधव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भाज्यांची लागवड करतात. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्यामुळे माळरानावर लावलेली भाजी तयार होण्यास विलंब लागला. मात्र मागील आठवड्यापासून विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारपेठेत येऊ लागल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर तयार होत असलेल्या या भाज्या खाण्यासाठी रुचकर आणि चवदार असल्याने त्या भाज्या ग्राहक आवडीने खरेदी करतात. …

Read More »

‘त्या’ पर्यटकांचा शोध सुरूच

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील निगडे गावाजवळील निगडी नदीत  रविवारी (दि. 28) मुंबई चुनाभट्टी येथील पर्यटक रवी चव्हाण बुडाल्याची घटना घडली होती. अद्यापही त्या बुडालेल्या तरूणांचा तपास लागला नाही. वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई चुनाभट्टी येथील नऊ पर्यटक रविवारी पर्यटनांसाठी निगडे गावाजवळील निगडी नदीकिनारी गेले होते. त्यापैकी काहीजण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले …

Read More »

उमरोली येथे वाहून आले रेल्वेचे स्लीपर आणि खडी

कर्जत : बातमीदार मध्यरेल्वेच्या कल्याण-कर्जत मार्गाच्या बाजूला असलेल्या उमरोली गावातील शेतकर्‍यांच्या शेतात पावसाच्या पाण्याबरोबर रेल्वेचे स्लीपर वाहून आले असून, रेल्वे मार्गाची खडीदेखील मोठ्या प्रमाणात आली आहे. दरम्यान, महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील शेतकरी हिरू बुंधाटे आणि सुरेश बुंधाटे यांची भातशेती गारपोली गावाजवळ आहे. त्यांच्या …

Read More »