खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील भिलवले धरण पूर्णपणे भरून ओसंडून वहात आहे, त्याच पाण्याच्या प्रवाहातून सोमवारी (दि. 29) चार किलो वजनाची एक मगर बाहेर आली. भिलवले धरणातून यापूर्वी तीन मगरी पकडून वन खात्याकडे सुपूर्द केल्या आहेत. आज पुन्हा पाण्याच्या प्रवाहातून चार किलो वजनाची मगर बाहेर आली. स्थानिक मजूर सोमनाथ वाघमारे, …
Read More »पाली, जांभुळपाडा पुलांवर पुराचे पाणी ; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, वाहतूक ठप्प, सतर्कतेचा इशारा
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. सोमवारी (दि. 29) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 30) सकाळी 8वाजल्यापासून या पुलावरील पाणी वाढल्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची …
Read More »पाण्याची शेती कशी कराल?
जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष पाण्याचीच शेती करण्याची वेळ आली आहे. ’पेरलत तरच उगवेल’ हा पारंपरिक शेतीचा मंत्रच या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. पाण्याची शेती, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल, हे संगण्यासाठीच पागोळी …
Read More »गुणांचा फुगवटा नकोच
विद्यार्थ्यांना शाळांकडून गुणांची खिरापत मिळण्याचा एक मार्ग म्हणून नव्हे तर भाषा विषयांत लेखीप्रमाणेच तोंडी प्राविण्यही जोखले जाणे योग्यच ठरते. यासंदर्भात झालेल्या इतक्या गदारोळानंतर तरी आता मूळ हेतूकडे दुर्लक्ष न करता शाळांकडून योग्य तर्हेने गुणदान होईल अशी अपेक्षा आहे. कारण गुणांचा अवास्तव फुगवटा अंतिमत: विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण वाढवणाराच ठरतो. राज्य शिक्षण …
Read More »आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात विचारविनिमय
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 4 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. 29) रायगड …
Read More »खारघरमधील राखी फेस्ट महोत्सवाचा समारोप
खारघर ः रामप्रहर वृत्त येथील भाजप कार्यालयाजवळ कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने दोन दिवसीय ‘राखी फेस्ट महोत्सवाचे’ अयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महिलांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या महोत्सवाला सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दापोली विद्यालयात वह्यावाटप
दापोली ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दापोली येथील रयत शिक्षण संस्थेच्या आनंता पांडुरंग भोईर विद्यालयामध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या …
Read More »पनवेल ः शहरातील तलावासमोरील भाजी मार्केट येथील म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बिकानेर हे दुकान नव्याने सुरू झाले आहे. याचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी शांताराम पाटील, हुसेन शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »पनवेल ः भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर सरचिटणीस सपना पाटील यांना वाढदिवसानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सरचिटणीस लीना पाटील, श्वेता खैरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Read More »पनवेल : शहरातील उरण नाका येथील मच्छीमार्केटच्या स्वच्छतेसंदर्भात सोमवारी महापालिकेच्या वतीने पाहणी करण्यात आली. या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रसाळ, सहाय्यक आयुक्त भोसले, शहर अभियंता कटेकर आदी उपस्थित होते. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper