Breaking News

Ramprahar Reporters

मुजोर चीनचा महाडमध्ये निषेध

महाड : प्रतिनिधीचिनी सैन्यासोबत सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या कृत्याचा महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 18) चवदार तळे येथे चीनचा राष्ट्रध्वज आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला.चिनी सैन्य भारतीय सीमारेषेजवळ घुसखोरी करीत असून आपले जवानही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. चीनविरुद्धच्या …

Read More »

रायगड जिल्ह्याने पार केला दोन हजार रुग्णांचा टप्पा

पनवेल : रायगड जिल्ह्याने कोरोना रुग्णांचा दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि. 18) कोरोनाच्या 84 रुग्णांची भर पडली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 51, पनवेल ग्रामीणमधील 17, उरण तालुक्यातील सात, अलिबाग तालुक्यातील सहा आणि पेण तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे, …

Read More »

यंदा गणेशोत्सवही साधेपणाने

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर निर्णय मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरुवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून, मंडळांनी सरकार देईल तो आदेश मान्य करणार असल्याचे …

Read More »

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करणार!

मुरूडमधील नागरिकांचा महावितरणला इशारा मुरूड : प्रतिनिधीमुरूड शहरासह तालुक्यातील 72 गावे गेल्या 16 दिवसांपासून वीजपुरवठ्याविना अंधारात आहेत. नागरिक या परिस्थितीला वैतागले असून, त्यांच्या भावनांचा बांध अखेर फुटला. तहसील कार्यालयात झालेल्या सभेत त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या कासवछाप काराभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.निसर्ग चक्रीवादळ …

Read More »

किल्ले रायगड अंधारात

निद्रिस्त राज्य सरकारचा भाजपकडून निषेध महाड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडलादेखील बसला आहे. पोल पडल्याने गडावरचा वीजप्रवाह गेल्या 15 दिवसांपासून खंडित आहे. याविरोधात निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 18) निषेध व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन …

Read More »

आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत  

भाजप युवा मोर्चा करणार स्वदेशीचा जागर पनवेल : रामप्रहर वृत्त‘आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये विदेशी बनावटीच्या वस्तूंऐवजी स्वदेशी विकल्पाबद्दल प्रसार व प्रचार करण्यासंदर्भात युवा मोर्चा जिल्हाभरात युवकांमध्ये जागृती करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाने प्रभावित होऊन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत’ …

Read More »

रायगडात तब्बल 87 नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाच्या तब्बल 87 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41, पनवेल ग्रामीणमध्ये 18, पेण तालुक्यात 12, महाड तालुक्यात पाच, कर्जत तालुक्यात चार, अलिबाग तालुक्यात तीन आणि उरण, खालापूर, रोहे व माणगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला …

Read More »

ऑनलाइन कविसंमेलन साहित्यिकांसाठी पर्वणी -महापौर डॉ. कविता चौतमोल

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या संकटामुळे महिला कवी, साहित्यिक एकत्र भेटू शकत नाहीत. आपली कला सादर करू शकत नाहीत, पण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कवयित्रींसाठी घेण्यात आलेले ऑनलाइन कविसंमेलन म्हणजे एक साहित्यिक पर्वणी असल्याचे उद्गार पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी काढले. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या …

Read More »

ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर  

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल प्रभाग क्रमांक 19तर्फे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.    लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने झालेल्या विविध गटांतील या स्पर्धेत संयुक्ता संदीप शेलार, ईश्वरी विनय सोनटक्के, …

Read More »

नागोठण्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आजपासून चार दिवस बाजारपेठ बंद

नागोठणे : प्रतिनिधीशहरासह विभागात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून, दुसरीकडे गुरुवार ते रविवार असे चार दिवस येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. नागोठणे शहरातील एका 51 वर्षीय व्यक्तीसह बेणसे येथील 34 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. …

Read More »