विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला ट्वेन्टी-20 सामना रविवारी (दि. 25) विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार असून, रिषभ पंतलाही आघाडीला खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणार्या भारतीय संघाला ट्वेन्टी-20 मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पावसामुळे …
Read More »Monthly Archives: February 2019
राजगड ते रायगड दौड
भिडे गुरुजींची प्रकृती अस्वस्थ, उपचारानंतर पुन्हा दौड सुरुच महाड : प्रतिनिधी शिवप्रतिष्ठान आयोजित किल्ले राजगड ते दुर्गराज रायगड अशा भव्य पायी दौड दरम्यान मढेघाट मार्गे दहिवड या गावी आल्यानंतर भिडे गुरुजी यांची प्रकृती बिघडली. त्यांना रात्री महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसर्या दिवशी पुन्हा गुरुजी शिवभक्तांसोबत दौडमध्ये …
Read More »बोलेरो जीपची मोटार सायकलला धडक
पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या अलिबाग गेटच्या बाजूला धरमतर ब्रिजजवळ शुक्रवारी (दि. 22) सकाळी बोलोरो जीपने मोटार सायकलला ठोकर दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार व मागे बसलेला इसम असे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे बोलोरो जीप (एमएच-01, डीइ-1677) जेएसडब्ल्यू कंपनी येथून वडखळ – …
Read More »रोहा तालुका भाजप ओबीसी मोर्चा पदाधिकारी जाहीर
रोहे : प्रतिनिधी भाजप ओबीसी मोर्चाच्या रोहा तालुका उपाध्यक्षपदी विशाल दळवी, प्रवीण कोतवाल व अनंता बिरगावले यांची तर चिटणीसपदी मारुती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पाली (ता. सुधगड) येथे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत नियुक्तीपत्रे देण्यात आली. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार …
Read More »कर्जत-खोपोली मार्गावर आज मेगाब्लॉक
कर्जत : बातमीदार कर्जत-खोपोली या उपनगरीय रेल्वे मार्गावरील पुलाचे काम करण्यासाठी रविवारी (दि. 24) सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडून खोपोलीला आणि खोपोलीकडून मुंबईला जाणारी प्रत्येकी एक फेरी कर्जत-खोपोली दरम्यान रद्द करण्यात आली आहे. त्याचवेळी या मार्गावर चालविण्यात येणार्या शटल सेवेच्या तीन फेर्यादेखील …
Read More »कर्जत तालुक्यात 8 थेट सरपंच आणि 59 सदस्यांसाठी आज मतदान
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचे थेट सरपंच आणि सदस्य निवडीसाठी रविवारी (दि. 24) मतदान घेण्यात येत आहे. या आठ ग्रामपंचायतीमधील एकूण 82 जागांपैकी 23 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने 59 सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. या आठ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच 20 तर सात ग्रामपंचायतीमधील 59 सदस्यांसाठी 126 उमेदवारांनी …
Read More »पूजा पाटील यांचा विजय निश्चित
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; वढाव ग्रामपंचायत निवडणूक पेण : प्रतिनिधी वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार पूजा अशोक पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वढाव येथे केले. वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या यांच्या …
Read More »सहज सेवा
॥ मनी नाय भाव, अन् देवा मला पाव। देव अशाने पावायचा नाय रे, देव बाजारचा भाजीपाला नाय रे। हा समाजसेवेचा संदेश देणार्या गाडगेबाबांनी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवितो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठं पाऊस ॥ …
Read More »मतभेदांना द्या मूठमाती, निश्चित जिंकणार भाजप-शिवसेना मित्रपक्षांची महायुती!
मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांच्या विलेपार्ले विधानसभेतील पोटनिवडणुकीत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा हिंदुत्वाचा घेतला आणि 1989 नंतर खर्या अर्थाने मराठी माणसाच्या, त्याच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना हिंदुत्ववादी बनली. आपण हिंदुत्व का घेतले याबद्दल दस्तुरखुद्द बाळासाहेबांनी मला 20 जानेवारी 2010 रोजी ‘मातोश्री’ येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. …
Read More »पोलादपुरात काँग्रेसला धक्का
पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवकपद भूषविणार्या लक्ष्मण जगताप गुरुजींचा सुशिक्षित मुलगा प्रशांत आणि नातू जयेश जगताप यांनी स्थानिक नेतृत्वाला कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, बिपीनदादा म्हामुणकर आणि संदीप ठोंबरे यांनी या दोघांचे भाजपत …
Read More »