Breaking News

Monthly Archives: March 2019

उरण तालुक्यात ‘ॐ नम: शिवाय’चा गजर

जेएनपीटी : प्रतिनिधी बम बम भोले, हर हर महादेव, ओम नमः शिवायचा गजर करत समुद्रावर स्वार होत काल हजारो शिवभक्तांनी घारापुरी येथील प्रसिद्ध शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उरण, पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई येथून दरवर्षी जवळजवळ 50 ते 75 हजार शिवभक्त घारापुरी येथे येतात. घारापुरी येथे जाणार्‍या …

Read More »

महाड एसटी स्थानकाचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

महाड : प्रतिनिधी गेली कित्येक वर्षे रखडलेल्या महाड बसस्थानकाच्या नूतन व आद्ययावत इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने वचनपूर्ती केली असून सहा कोटी खर्चाच्या या बसस्थानकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (दि 7)सकाळी 11 वाजता पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ. …

Read More »

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पेण पालिकेतर्फे विकासकामे

पेण : प्रतिनिधी पेण नगरपालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहोळा बुधवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री अनंत गीते व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांच्या हस्ते व माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या सोहोळ्यास …

Read More »

जिल्हा प्रज्ञा प्रकोष्ठतर्फे उद्या बुद्धिजीवी संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रज्ञा प्रकोष्ठ तर्फे बुधवारी (दि. 6) सायंकाळी 6 वाजता खारघरमध्ये रायगड जिल्ह्यातील बुद्धिजीवींचे संमेलन आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार किरिट सोमय्या मार्गदर्शन करणार असून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …

Read More »

कुंभमेळ्यात मुख्यमंत्र्यांचे गंगास्नान

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या  कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित भव्य आणि दिव्य …

Read More »

लक्ष्यावर हल्ला चढवणं हेच फक्त आमचं काम

हवाई दल प्रमुखांनी खडसावले नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सरकारने पुराव्यासकट जाहीर करावे, अशी मागणी होत असतानाच याबाबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लक्ष्यावर हल्ला चढवणं हे आमचं काम आहे. एअर स्ट्राइकमध्ये किती …

Read More »

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवशींनी केली मतदान केंद्रांची पाहणी

अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यात 2 व 3 मार्चला मतदार नोंदणी विशेष अभियान राबविण्यात आले. त्यानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन दिवस जिल्ह्यातील दुर्गम भागातील तसेच अन्य विविध भागातील मतदान केंद्रांची पाहणी केली. शिवाय तेथे होत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावाही घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शनिवार आणि रविवार असे …

Read More »

रायगडात घुमला बमबम भोलेचा गजर; जिल्ह्यात महाशिवरात्र उत्साहात साजरी

अलिबाग : प्रतिनिधी हिंदु धर्मातील सण उत्सवात महत्वाचे स्थान असणारी महाशिवरात्र सोमवारी (दि. 4) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. जिल्ह्यात सर्वत्र बमबम भोलेचा गजर सुरू होता. या निमित्ताने  जिल्ह्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त  दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरांमध्ये गर्दी पहायला मिळत होती. दक्षिण …

Read More »

वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाईन शुल्क

अलिबाग : जिमाका पेण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोव्हेंबर 2017पासून ऑनलाईन वाहन 4.0 संगणक प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. या संगणक प्रणालीवर वाहनविषयक सर्व कामकाज करण्यात येत आहे. 1 मार्चपासून ऑटो रिक्षासह सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व त्यासाठीच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट कामकाज व शुल्क भरणा ऑनलाईन करण्यात …

Read More »

पेण तालुक्यात विजयी संकल्प रॅली; मोदींचा जयघोष

पेण : प्रतिनिधी तालुका भाजपच्या वतीने रविवारी पेण तालुक्यात विजयी संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, युवा नेते ललित पाटील, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, कामगार संघटना अध्यक्ष विनोद शहा, अजय क्षीरसागर, …

Read More »