Breaking News

Monthly Archives: March 2019

खालापुरात टाकाऊ प्लास्टिक खाल्ल्याने दोन गुरे दगावली

अत्करगाव परिसरातील घटना; पोलिसांत तक्रार खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील अत्करगाव या गावाच्या हद्दीत एका कारखान्याने कंपाऊंड न करता त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत केमिकलमिश्रित प्लास्टिक टाकल्याने सदरचे प्लास्टिक येथील दोन गुरांनी खाल्ल्याने ती बेशुद्ध होऊन मरण पावल्याची घटना रविवारी (दि. 3) दुपारी घडली. या प्रकरणी येथील नागरिकांनी या कंपनी मालकाच्या …

Read More »

पनवेलकरांची संध्याकाळ गजलमध्ये रंगली

पनवेल : रामप्रहर वृत्त रविवारची (दि. 3) संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक संघात रंगलेल्या गजल मैफिलीने पनवेलसाठी खास ठरली. निमित्त होते पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ‘अक्षयाची पालखी’ या गजल मैफिलीचे. शहादा नंदुरबार येथून आलेल्या प्रा. डॉ. सतीश भांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संगीतबद्ध केलेल्या ए. के. शेख यांच्या गजलांनी कार्यक्रमात बहार आणली. नसीमा …

Read More »

गंभीरने जाहीर केली त्याची चर्ल्डकप टीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय सीरिज खेळत आहे. भारतीय टीमच्या मॅनेजमेंट वर्ल्डकपसाठीची टीम अजून घोषित केलेली नाही. संपूर्ण देशाचं लक्ष हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 वनडे सिरीजवर आहे. कारण आताची कामगिरी ही वर्ल्डकपमध्ये टीमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी वर्ल्डकपसाठी आपली टीम जाहीर …

Read More »

विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठस्तरावर लोकपाल

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपद्धतीची गरज दिसून आली. विद्यापीठ तक्रार निवारण संदर्भात एकरूप परिनियम तयार करण्यात आला आहे. या परिनियमामुळे महाविद्यालय, तसेच विद्यापीठ स्तरावर तत्काळ निवारण कक्षाची योजना आणि विद्यापीठ स्तरावर अपील करण्यासाठी लोकपाल नियुक्त …

Read More »

आवरे मॅरेथॉनवर कल्पेश देवरे आणि संदीप पाल यांची मोहोर

प्रतिनिधी (आवरे ) एक धाव आरोग्यासाठी, पूर्वजांच्या स्मरणासाठी, उरण पूर्व विभागात राबवित असलेल्या निगा फाउंडेशन तर्फे सोमा रामा गावंड मॅरेथॉन ही रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन संलग्नित मिनी मॅरेथॉन स्पर्धा आणि या स्पर्धेत 10 किमी या खुल्या गटात पुरुष व महिला गटात ऋतुजा सकपाल आणि संदीप पाल या स्पर्धकांनी वर्चस्व गाजविले. …

Read More »

काँग्रेसची मानसिकता

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याबाबतच काँग्रेसने साशंकता व्यक्त करीत आपली मानसिकता दाखविली आहे. वास्तविक असे आरोप करण्यापूर्वी काँग्रेसने आपणही कधी काळी सत्तेत होतो हे सोईस्कररीत्या विसरलेले आहे. अशा प्रकारे आरोप करून काँग्रेसवाले सैन्य दलाचे खच्चीकरण करीत आहेत, असेच म्हणावे लागेल. पुलवामा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हवाई दलाने …

Read More »

‘युनायटेड रन’ म्हणत नवी मुंबई धावली

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्युट, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई युनायटेड रन’ या संकल्पना वाक्यावर आधारित नवी मुंबई महापौर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील 3500 हून अधिक नागरिकांनी सहभागी होत ही मॅरेथॉन सर्वार्थाने यशस्वी केली. देशभरात आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय …

Read More »

नेरळ ग्रामीण कबड्डी लीगवर नेरळ लायन्सचे वर्चस्व

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य केतन पोतदार यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेली पहिली नेरळ ग्रामीण कबड्डी लीग नेरळ लायन्स संघाने जिंकली. नेरळ आणि परिसरातील ग्रामीण कबड्डी संघातील नामांकित खेळाडू यांचे आठ व्यवसायिक संघ स्पर्धेत सहभागी झाले आहे. या वेळी बोलताना प्रो-कबड्डीपटू नीलेश साळुंखे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंनी …

Read More »

भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल : आयसीसी

मुंबई : प्रतिनिधी यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार्‍या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या बीबीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळून लावली आहे. आयसीसीच्या नियमावलीमध्ये अशा कारणासाठी एखाद्या संघाला बहिष्कृत करण्याचा कोणताही नियम नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या या मागणीला आयसीसीच्या बैठकीत पाठिंबा मिळाला नाही. 14 फेब्रुवारीच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरही भारताने पाकिस्तानला घेरण्याची …

Read More »

बनावट नोटा शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडले

पनवेल : वार्ताहर बनावट नोटा शोधून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी एका महिलेजवळची एक लाख रुपयांची रोख रक्कम आपल्याकडे घेऊन त्यातील 38 हजार रुपयांच्या नोटा हातचलाखी करून चोरून पलायन केल्याची घटना कळंबोली सेक्टर-11मधील स्टेट बँकेत घडली. कळंबोली पोलिसांनी या भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून  त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात …

Read More »