जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त पनवेलप्रमाणेच उरण तालुक्यातही भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून रविवारी (3 फेब्रुवारी) खोपटा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश करीत विकासाचे कमळ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्षा सायली …
Read More »Monthly Archives: March 2019
पाकसमवेत खेळण्यासाठी दबाव
मुंबई ः प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये खेळू नये, अशी देशवासीयांची भावना होती. त्यानंतर बीसीसीआयनेदेखील आम्ही पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आयसीसीला कळवले होते, पण आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय …
Read More »विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी -न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी
पेण : मराठी भाषेला संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी संतांचे साहित्य वाचकांनी वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मराठी वाचन व लेखन संस्कृती जोपासावी, असे आवाहन पेण न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी यांनी येथे केले. पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी …
Read More »करवाढ नसलेला खोपोली पालिकेचा अर्थसंकल्प
खोपोली : कोणतीही करवाढ नसलेल्या खोपोली नगर पालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला बुधवारी (दि. 27) मंजुरी देण्यात आली. खोपोली नगर पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. या सभेत सन 2019-20चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात आरंभीच्या शिलकेसह 131 कोटी 23 लाख 47 हजार रु. उत्पन्न, तर अपेक्षित …
Read More »अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देणार -डॉ. एस. एफ. डिसूजा
कर्जतमध्ये भात संशोधन सभा कर्जत : भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळ्या संशोधन पद्धतीची गरज असून अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अणू विज्ञान संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. डिसूजा यांनी कर्जत येथे केले. महाराष्ट्र राज्य भात गटाच्या भात संशोधनावरील 53व्या सभेचे …
Read More »फेडरर नाबाद 100
दुबई : वृत्तसंस्था महान टेनिसपटू रॉजर फेडररने दुबईतील एटीपी टेनिस स्पर्धेत स्टेफॅनो सितसिपासला 6-4, 6-4 असे पराभूत करत आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील 100वे एटीपी विजेतेपद पटकावले. 20 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणार्या 37 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सनंतर 100 विजेतीपदे जिंकणारा टेनिसपटू म्हणून आपला ठसा उमटवला आहे. कॉनर्सच्या खात्यात 109 विजेतीपदे आहेत. …
Read More »प्रलंबित महाड-मढेघाट-पुणे मार्गाला हिरवा कंदील
आ. प्रवीण दरेकरांमुळे स्वप्न होणार साकार महाड : महाडकरांसाठी दिवास्वप्न ठरलेल्या पुण्यासाठी जवळचा असलेला महाड-मढेघाट-पुणे या मार्गाच्या प्रलंबित प्रस्तावाला तत्काळ मान्यता देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. आ. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीनुसार गडकिल्ल्यांना जोडणार्या या मार्गाला पर्यटन मार्ग म्हणून विकसित करण्याबाबत सूचना मुख्य सचिवांना देण्यात …
Read More »बिर्ला कार्बन कंपनीची सामाजिक बांधिलकी
चौक : प्रतिनिधी सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर, चौक शाळेत जागतिक मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत बिर्ला कार्बन कंपनी प्रा.लि.पाताळगंगा यांच्या सौजन्याने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत कंपनीचे प्रतिनिधी मानव संसाधन विभाग प्रमुख प्रकाश देसाई व समाज विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आर. ओ. वॉटर …
Read More »एसटी प्रवासी भारमानात रायगड शेवटच्या क्रमांकावर
अलिबाग : प्रतिनिधी प्रवाशांच्या भारमानात एसटीचा रायगड विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर होता, मात्र दिवसेंदिवस एसटी प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे रायगड विभाग भारमानात राज्यात शेवटच्या क्रमांकावर गेला आहे. राज्य परिवहन मंडळाने भाडेवाढ केल्यामुळे रायगड जिल्ह्यात एसटी उत्पन्नात वाढ झाली आहे, मात्र प्रवाशांची संख्या कामी झाल्यामुळे भारमान मात्र …
Read More »‘आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणातील प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला द्या’
प्रांताधिकार्यांपुढे जनसुनावणी; निवेदन सादर मुरुड : प्रतिनिधी नियोजित आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणासाठी प्रशासनाच्या वतीने प्रकल्पबाधित शेतकर्यांची मते जाणून घेण्यात आली. या वेळी योग्य मोबदला मिळावा, अशी रास्त मागणी प्रकल्पबाधितांच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथे सुमारे दोन हजार 700 कोटी रुपये खर्च करून दिघी-आगरदांडा बंदर विकसित होत आहे. बाहेर देशातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper